Srikant_Waghwale 
पुणे

कर्तव्य बजावत वर्दीतला माणूस वाढवतोय कोरोना रुग्णांचं मनोधैर्य!

समाधान काटे

गोखलेनगर (पुणे) : कर्तव्यावर असताना श्रीकांत वाघवले यांना कोरोनाची लागन झाली. कुटुंबातील सदस्य, वरिष्ठ अधिकारी, नातेवाईक, मित्र यांनी धीर दिला आणि आज वाघवले पूर्वीप्रमाणे आपले कर्तव्य बजावत आहेत, पण हे करत असताना सामाजिक दायित्व म्हणून दररोज पाच कोरोना रुग्णांना धीर देण्याचे कामही ते करत आहेत.

पुणे शहरात सोमवार पेठेतील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले श्रीकांत वाघवले यांची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली. गुन्हे शाखेत काम करीत असताना युनिट-१ हद्दीतील बराचसा भाग प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने त्यांना सतत बाहेर फिरावे लागत होते. अशातच चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे वाघवले यांना टेन्शन आले होते; परंतु त्यांची पत्नी आणि मुलीची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. डाॅक्टर, वरिष्ठ अधिकारी यांनी नियमित विचारपूस केली, याचा सकारात्मक परिणाम झाला आणि कोरोनातून बरे होत ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. सहकाऱ्यांनी मनोधैर्य वाढवले ‌म्हणूनच आज वाघवले इतर कोरोना रुग्णांना मानसिक आधार देत आहेत.

पोलीस आयुक्त, सह आयुक्त, वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 'भरोसा सेल'च्या माध्यमातून पुणे पोलिस दलातील जे कोरोनामुक्त होऊन परत कर्तव्यावर हजर झाले आहेत. त्यांच्यामार्फत पुणे शहरातील कोरोना पेशंटशी संवाद साधत आहेत. दररोज ५ कोरोना रूग्णांना मानसिक आधार देण्याचं काम देखील ते करतात. नागरिकांनी कोरोना झाला तर काय काळजी घ्यायला हवी, घाबरून न जाता सकारात्मक विचारांनी कोरोनावर मात करू शकतो, यासह कोरोना रुग्णांची आर्थिक अडचण असेल, तर इतर पर्याय कोणते आहेत याची माहिती देऊन कोरोना रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम वाघवले करत आहेत.

"कोरोनात तुम्हाला औषधांबरोबर मानसिक आधाराची गरज असते. जेवढे तुम्ही सकारात्मक राहाल, तेवढे लवकर तुम्ही कोरोनावर मात करू शकता. कोरोनाला घाबरून न जाता डाॅक्टरांच्या सल्ल्याने स्वत:ची काळजी  घ्यायला हवी".
- श्रीकांत किसन वाघवले, पोलिस युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहर.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT