Shaley-Poshan-Aahar 
पुणे

पुणे : आता अंगणवाडीतील बालकांना घरीच मिळणार पूरक पोषण आहार!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शालेय पोषण आहाराच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील बालकांना त्यांच्या घरीच पूरक पोषण आहाराचे कच्चे साहित्य (रॉ मटेरिअल) वाटप केले जाणार आहे.

यासाठी राज्य सरकारने पुणे जिल्हा परिषदेला गुरुवारी (ता.२३) विशेष परवानगी दिली आहे. यानुसार जिल्ह्यातील एक लाख पाच हजार बालकांना येत्या ३० जूनपर्यंतच्या  पोषण आहाराचे साहित्य घरीच दिले जाणार आहे. 

यामध्ये तांदूळ, रवा, साखर, मटकी, तूरदाळ, तेल आणि तिखट आदी वस्तूंचा समावेश  असणार आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये प्रवेश असलेल्या  तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना याचा लाभ होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांनी सांगितले.

लॉकडाउनमुळे गेल्या महिनाभरापासून अंगणवाड्या बंद आहेत. केवळ बालकांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा करण्यासाठी अल्प काळ अंगणवाड्या सुरु ठेवण्यात येत असत. परंतू कोरोना विषाणू संसर्गाचा ग्रामीण भागातही शिरकाव झाल्यानंतर पूरक पोषण आहार वाटप बंद करण्यात आले होते.

त्यामुळे अंगणवाड्यांमधील पोषण आहाराचे साहित्य बालकांना घरीच वाटप करण्याची परवानगी पुणे जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे मागितली होती. त्यास राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त इंदिरा मालो यांनी आज परवानी दिली.  

- जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या - ४२००
- मिनी अंगणवाड्यांची संख्या - ४००
- अंगणवाड्यांमधील बालके - १ लाख ५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT