Thank_A_Teacher
Thank_A_Teacher 
पुणे

यंदा शिक्षकदिनी म्हणा 'थँक अ टीचर'; शिक्षणमंत्र्यांनी केली मोहिमेची घोषणा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "एकदा खूप गर्दी असलेल्या बसमधून उभ्याने प्रवास करत होते. गर्दीतून एक गृहस्थ अचानक आपल्या जागेवरुन उठले आणि 'बाई या जागेवर बसा' म्हणाले. बसमध्ये अन्य महिला देखील होत्या, मग त्याने मलाच का जागा दिली, असा प्रश्न नकळत मनात आला. आणि ते त्या गृहस्थाने अचूक हेरले. तो म्हणाला,"बाई, मी शांताराम ओळखल का? मी तुमच्याच शाळेत शिकलो, असे म्हणत त्याने बसमध्ये सर्वांच्या समोर मला वाकून नमस्कार केला आणि बसमधील अन्य प्रवासी फक्त पाहतच राहिले," असा अनुभव सध्या मुख्याध्यापिका असणाऱ्या स्मिता कुलकर्णी यांनी सांगितला. 

अशाप्रकारे आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांवर आपल्या विद्यार्थ्यांची गाठ पडली, तर केलेल्या सेवेचे चीज झाल्यासारखे वाटते, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. कुलकर्णी या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. गेली तब्बल ३७ वर्ष त्या अव्याहतपणे शिक्षण सेवा देत आहेत. शिक्षकांना असे अनुभव नेहमीच येतात. खरंतर प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत शिक्षकांचा वाटा मोलाचा असतो, पण प्रत्येकालाच शिक्षकांबद्दल असणारा आदर, जिव्हाळा व्यक्त करता येतोच असे नाही. मात्र आता शिक्षकांबद्दलची कृतज्ञता, आदर व्यक्त करण्याची संधी तुम्हालाही मिळणार आहे बरं का! राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 'थँक अ टीचर' या मोहिमेची घोषणा नुकतीच केली आहे. येत्या शनिवारी (ता.५) असणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून ही मोहिम सुरू करण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण असते.

सध्या कोरोनाच्या संकट काळात शाळा बंद आहेत. अचानक ओढावलेल्या या संकटाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, म्हणून शिक्षकांनी कंबर कसली आणि ऑनलाइन शिक्षणाची कवाडे खुली केली. ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेट कनेक्टिविटी नसलेल्या भागात शिक्षक स्वतः ज्ञानदानासाठी विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोचले आहेत. त्यामुळेच अशा शिक्षकांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात येत आहे. याबाबत गायकवाड यांनी 'ट्वीटर'द्वारे ही माहिती दिली असून त्यासंदर्भात एक ध्वनीचित्रफितही अपलोड केली आहे.

याशिवाय कोरोनाच्या काळात शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोचत आहेत. त्यासाठी शिक्षकांची नवीन कौशल्य, नवीन शैक्षणिक साधने वापरण्याची इच्छा दिसून येते. केवळ शाळेमध्ये जाऊन शिकविणे या पलिकडे जाऊन आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षक मुलांना शिक्षण देत आहेत.

काही शिक्षक स्वतः पुढाकार घेऊन स्वतः मुलांच्या घरापर्यंत जाऊन शिकवित आहेत. शिक्षकांच्या या ज्ञानदानाच्या सेवेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, अशा आशयाचे पत्र गायकवाड यांनी राज्याच्या महसूल विभागाकडेही पाठविले आहे.

'थँक अ टीचर' मोहिमेत सहभागी होण्यासाठी :
तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शिक्षकांबद्दलचा आदर, कृतज्ञता, भावना व्यक्त करा आणि  'थँक अ टीचर' हा हॅशटॅग वापरून ती पोस्ट करा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT