junnar  
पुणे

कोरोनाबाधित व नागरिकांमध्ये पेटला वाद...या आमदारांनी उचलले हे पाऊल...

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर शहराच्या मध्य वस्तीतील सहकारी गृहरचना सोसायटीतील कोरोनाबाधित रुग्ण व फ्लॅटधारकांच्या वादात आमदार अतुल बेनके यांनी मध्यस्थी करून हा वाद यशस्वीपणे मिटविला.  

जुन्नरमधील संबंधित सोसायटीत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर सर्व फ्लॅटधारकांना होम क्वारंटाइन करण्यात येऊन सोसायटी शुक्रवारी (ता. १२) सील करण्यात आली होती. कोरोनाबाधित व्यक्तीच्या आई व वडिलांना लेण्याद्री येथील कोविड केंद्रात ठेवण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे रविवारी (ता. १४) त्यांना  होम क्वारंटाइन करण्यात आले. या वेळी अन्य सभासदांनी सोसायटी सील असताना हे घरात कसे आले, अशी एकत्रितपणे विचारपूस सुरू केली. याबाबत पालिका प्रशासनाने देखील कानावर हात ठेवले. त्यामुळे अध्यक्ष व अन्य सभासदात शाब्दिक वादाला सुरवात झाली.

दरम्यान, पुणे येथे उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीने याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या आईवडिलांना सोसायटीतील अन्य सदस्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीने व्यथीत होत समाज माध्यमाचा आधार घेत गैरसमजुतीने काही नावासह निवेदन प्रसिद्ध केल्याने वाद वाढला. त्याला प्रत्यूत्तर म्हणून येथे घडलेल्या घटनेची पोस्ट देखील व्हायरल झाली. दरम्यान, या सोसायटीतील इतर फ्लॅटधारक पिता-पुत्रांनी कोरोनाबाधित क्षेत्रातून बाहेर पडत व्यवसाय सुरू केला. त्यामुळे प्रशासनाने या इमारतीतील मेडिकल दुकान, लॅब या अत्यावश्यक सेवांचे गाळे देखील सील केले. सोसायटी परिसर सील करताना एक पतसंस्था देखील बंद झाली होती. 

या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आमदार अतुल बेनके आले. या वेळी मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, नगरसेवक दिनेश दुबे, भाऊ कुंभार, पापा खोत आदी उपस्थित होते. बेनके यांनी फ्लॅटधारकांशी चर्चा केली. कोरोनावर मात करण्यासाठी सगळ्यांनी एकदिलाने काम करण्याची गरज असून, गैरसमजातून सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट डिलीट कराव्यात, संबंधित रुग्ण बरा झाल्यानंतर आपण सर्वासमवेत बैठक घेऊन गैरसमज दूर करू या, असे सांगितले.

आमदार बेनके यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकाने व पतसंस्था व सोसायटीतील प्रश्न सोडविण्यासाठी  केलेल्या सहकार्याबद्दल डॉ. विलास चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ; व्यापारी बँकांकडून जादा व्याज आकारणीचा संशय, ५.५ लाख खाती ऑडिटच्या कक्षेत

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

SCROLL FOR NEXT