petrol.jpg
petrol.jpg 
पुणे

लाॅकडाउनमध्ये पेट्रोल भरताय, सावधान...

सुवर्णा नवले

पिंपरी : विनाकारण रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना चाप लावण्यासाठी अत्यावश्‍यक सेवेव्यतिरिक्त पेट्रोल-डिझेल देणे बंद केले आहे. तरीही रिकामटेकड्यांची गर्दी रस्त्यावर दिसून येत आहे. त्यावर उपाय म्हणून पेट्रोल डीलर असोसिएशनच्यावतीने 'पीडीएपी ईसीआरएस' ऍप तयार केले आहे. या ऍपच्या माध्यमातून आता पेट्रोल भरणाऱ्यांची कुंडलीच मिळणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडमधील सर्व पंपांना 11 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पोलिस कर्मचारी, डॉक्‍टर, पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, औषध विक्रेते व निर्माते, आरोग्य सेवेतील सर्वजण, सरकारी अधिकारी व महापालिका कर्मचारी, खासगी सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, टेलिफोन कर्मचारी, बॅंक कर्मचारी, इंटरनेट कर्मचारी, होम डिलिव्हरी बॉय, वीज वितरण कर्मचारी या सर्वांना मुभा देण्यात आली आहे.

अत्यावश्‍यक सेवेतील सर्वांची इंत्थभूत माहिती ओळखपत्र व फोटोसह ऍपमध्ये भरावयाची आहे. याशिवाय रुग्णवाहिका, पोलिस व्हॅन, पोलिस पास वाहने यांचे आधारकार्ड तपासले जात आहे. तसेच शेतीमाल, अन्नधान्य व दूध वितरण वाहने, ग्रामीण भागातील शेतमालाची वाहने व अवजारे यांचे आधारकार्ड व सातबारा अऊपच्या माध्यमातून तपासला जात आहे.

सामाजिक बांधिलकीतून निर्णय-
पुणे जिल्ह्यांत अत्यावश्‍यक सेवा वगळता 14 हजार दुचाकी जप्त करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरात 181 पंपावर तर पिंपरी-चिंचवड हद्दीत एकूण 44 पेट्रोल पंपावर या ऍपचा वापर सुरू केला आहे. त्यापैकी बऱ्याच पंप चालकांनी अद्यापपर्यंत अंमलबजावणी केलेली नाही. रिकामटेकड्यांना पंपावर पेट्रोल दिल्यास कारवाईचे आदेशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

पंप चालकांसाठी हे क्‍लाऊड बेस ऍप तयार करण्यात आले आहे. सव्वा दोनशे पंपावर सध्या या ऍपची अंमलबजावणी केली आहे. पुणे शहरात प्रामुख्याने सुरू करण्याचा हेतू आहे. घरी बसून प्रत्येकजण आकडेवारी पाहू शकतो. पुणे पोलिस देखील अनुचित प्रसंग घडल्यास सहकार्य करीत आहेत. भविष्यात गुन्हेगारीतून एखादी कारवाई झाल्यास या ऍपमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे.
- सागर रुकारी, उपाध्यक्ष, पेट्रोल डीलर असोसिएशन, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT