hadpasar.jpg 
पुणे

पुणेकरांनो, 'या' भागात पाच दिवस असणार कडक संचारबदी

सकाळवृत्तसेवा

हडपसर :  कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रभाग क्र. 23 मध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने सोमवारपासून (ता. 11) पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. स्वंयूस्फूर्तीने होणारा पुण्यातील हा पहिलाच जनता कर्फ्यू आहे. 

ससाणेनगर, काळेबोराटेनगर, गाडीतळ, हिंगणे मळा, उन्नतीनगर, उत्कर्षनगर, सातववाडी, गोंधळेनगर या भागात हा कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. प्रभागात तीन कोरोनोचा रुग्ण आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रभागात सुमारे एक लाख लोकसंख्या आहे.

प्रभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली असून, यापैकी कोरोनाशी संबंधित लक्षणे आढळलेल्या 20 जणांना क्वारंटाइन सेंटरमध्ये हलविले आहे. तर गेल्या दोन दिवसात कोरोनाबाधित रुग्ण सेंटरमध्ये आढळून आलेल्या भागात 4 हजाराहून अधिक नागरिकांची स्क्रिनिंग टेस्ट घेण्यात आल्याची माहिती नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिली. 

प्रभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने नगरसेवक ससाणे यांनी महापालिकेकडे प्रभाग 23 मध्ये कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्याची मागणी महापालिकेकडे केली.  मात्र, कंटेन्मेंट झोनच्या निकषात ते बसत नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रभागातील नगरसेवक वैशाली बनकर, मारुती आबा तुपे, उज्वला जंगले यांच्याशी चर्चा करून जनता कर्फ्यूची कल्पना मांडली व सर्व नगरसेवकांनी हा कर्फ्यू पुढाकार घेऊन तो यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याला महापालिका, पोलिस व स्थानिक दुकानदारांनी सहकार्य करण्याचा निश्‍चय केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सतेज पाटील थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरी; नवं समीकरण?

४३ वर्षांनंतर ‘मासूम’ची नवी कहाणी; ए. आर. रहमान यांनी रेकॉर्ड केली 3 गाणी

Ichalkaranji Child Death : दूध पिताना चिमुकल्याला ठसका लागून श्वास कोंडला अन्..., इचलकरंजीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

Marathi News Live Updates : नागपूरचे 106 जण अडकले नेपाळमध्ये; सर्वजण सुरक्षित; आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर जलप्रलयाचा थरार! महाभयंकर विनाशादरम्यान आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT