hadpsar2 
पुणे

पुण्यातील 'या' भागात गल्लोगल्ली भयाण शांतता, अन्... 

सकाळवृत्तसेवा

हडपसर (पुणे) : प्रभाग क्र. 23 मध्ये पाळण्यात आलेला जनता कर्फ्यूचा पहिला दिवस शंभर टक्के यशस्वी झाला. सकाळी सात पासूनच मुख्य बाजारपेठेसह, चौकाचौकात, रस्त्यावर, गल्लोगल्ली शुकशुकाट दिसत होता.

अत्यावश्‍यक सुविधा मेडिकल्स, हॉस्पिटल्स वगळता अन्य सुविधा दिवसभर बंद होत्या. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून करण्यात आले होते, त्याला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. 

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने प्रभागातील नगरसेवक योगेश ससाणे, वैशाली बनकर, मारूतीआबा तुपे, उज्वला जंगले यांनी केलेल्या आवाहनानुसार सोमवारी जनता कर्फ्यूमध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्याचे दिसून आले.

लोकांनी घरबसल्या टीव्ही, सोशल मीडीयाच्या माध्यमातून कर्फ्यू संदर्भातील माहिती देण्यात आली. काहींनी व्हॉटसअप, फेसबुकच्या माध्यमातून आपल्या राहत्या ठिकाणी कशाप्रकारे कर्फ्यू पाळला जात आहे, त्याची छायाचित्रे व व्हिडिओ शेअर केले. त्यामुळे ठिकठिकाणी कर्फ्यूची माहिती लोकांना घरबसल्या मिळाली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले, "कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठीच्या लढाईत जनतेची एकजूट दिसून आली. रस्त्यावर अक्षरशः शुकशुकाट होता. उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सकाळपासूनच पहावयास मिळत आहे. नागरिकांनी राष्ट्रीय आपत्ती विरोधात लढण्यास आम्ही खंबीर व सक्षम आहोत हे दाखवून दिले. त्यामुळे सर्वत्र स्तब्धता, शांतता, स्वछता नि शुकशुकाट पहायला मिळाला. कर्फ्यूचा पहिला दिवस बंद पाळला, त्याचप्रमाणे पुढील चार दिवस कडकडीत बंद नागरिकांनी पाळावा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सतेज पाटील थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरी; नवं समीकरण?

४३ वर्षांनंतर ‘मासूम’ची नवी कहाणी; ए. आर. रहमान यांनी रेकॉर्ड केली 3 गाणी

Ichalkaranji Child Death : दूध पिताना चिमुकल्याला ठसका लागून श्वास कोंडला अन्..., इचलकरंजीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

Marathi News Live Updates : नागपूरचे 106 जण अडकले नेपाळमध्ये; सर्वजण सुरक्षित; आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर जलप्रलयाचा थरार! महाभयंकर विनाशादरम्यान आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT