lock down 
पुणे

भोर- वेल्हे तालुक्याची आणखी परीक्षा, गुरुवारपासून कडक लॉकडाउन 

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर तालुक्यात काल कोरोनाचे ६ रुग्ण आढळल्यानंतर आज त्यामध्ये आणखी ९ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे भोरमधील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० झाली आहे. प्रशासनाने गुरुवारपासून (ता. २३) ३१ जुलैपर्यंत भोर आणि वेल्हे तालुक्यात लॉकडाउन जाहीर केला आहे. 

पोलिस काढणार रेखचित्रातून आरोपींचा माग, पाच दिवसांचा कोर्स
 
भोर तालुक्याती ५३ जणांचे स्वॅब सोमवारपर्यंत (ता. २०) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४५ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ३६ जणांचे अहवाल निगेटीव्ह, तर ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शिंदेवाडी व वेळू येथील प्रत्येकी ३ आणि किकवी, कांजळे व केळवडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. अद्यापही काही रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे. याशिवाय उत्रौली येथील कोरोनाग्रस्ताच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील १४१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचाही अहवाल येणे अद्यापही बाकी आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत क-हाळे यांनी दिली.

प्रशासनाने गुरुवारपासून (ता. २३) ३१ जुलैपर्यंत भोर आणि वेल्हे तालुक्यात लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून बाहेरील वाहने भोर- वेल्ह्याच्या हद्दीत येण्यास आणि भोर- वेल्ह्यामधील वाहने तालुक्याबाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. य़ासाठी पुणे- भोर मार्गावर खेड शिवापूर टोलनाका, नसरापूर फाटा आणि माळवाडी येथे चेक पोस्ट ठेवण्यात आले आहेत. मार्च महिन्यांपासून लॉकडाउनमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. मात्र, सर्वांच्याच हितासाठी पुढील आठ दिवसांत नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

भोर तालुक्याची कोरोनाची सद्यस्थिती  
एकून कोरोनाग्रस्त- १४१
उपचार घेत असलेले रुग्ण- ५७
उपचारानंतर घरी सोडलेले रुग्ण- ८३
स्वँब तपासलेले नागरिक- ५१०
कोरोनामुळे मृत्यू- १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : जंगलातील गुन्हेगारांना पकडले जाते, पण ठेवायचे कुठे? कोल्हापूर वनसंरक्षणातील गंभीर उणीव उघड

शिव ठाकरेपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याच्या घराला भीषण आग; थोडक्यात वाचला अभिनेता, व्हिडिओमधून दाखवली परिस्थिती

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये पक्षप्रवेशाआधीच गोंधळ, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Numerology : उशिरा का होईना पण यशस्वी होतातच 'या' तारखेला जन्मलेले लोक...नशिबात असतो अधिकारी बनण्याचा योग

Hormone Balance Tips: हार्मोन संतुलित ठेवायचे आहेत? सायली शिंदेचे खास योग व जीवनशैली टिप्स; दैनंदिन जीवनात कसे अमलात आणायचे पाहा

SCROLL FOR NEXT