Strict security from Pune Police at Serum Institute since morning for PM Vaccine Centres Visit 
पुणे

PM Vaccine Centres Visit : मोदींच्या पुणे दौऱ्याकडे जगाचे लक्ष; सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कडक बंदोबस्त

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना लशीचा आढावा घेण्यासाठी आज दुपारी पुण्यात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी लोहगाव विमानतळ ते हडपसरजवळील सीरम इन्स्टिट्युटपर्यंत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दर शंभर मीटर अंतरावर पोलिस ठाणे व वाहतुक शाखेचे पोलिस बंदोबस्तावर आहेत. दिल्लहून आलेल्या विशेष सुरक्षा पथकांसह गुन्हे शाखेची पथके सुरक्षेवर लक्ष ठेवत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हडपसरजवळील सिरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोना लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात असून या लशीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा होत आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या नियोजित वेळेनुसार दुपारी एक वाजता पोचणार होते, मात्र त्यामध्ये बदल होऊन ते दुपारी सव्वा चार वाजता पोचणार आहेत, असे असले तरीही सुरक्षा यंत्रणा मात्र पहाटेपासूनच सुरक्षेच्या कामाला लागल्या होत्या.मात्र पुणे पोलिस व विशेष सुरक्षा पथकांकडुन शुक्रवारपासुनच पंतप्रधानाच्या सुरक्षेच्यादृष्टीने काम सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा जान्याच्या मार्गावर रंगीत तालीम करण्यात आली.

दरम्यान, शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासूनच लोहगाव टेक्नीकल विमानतळ ते सिरम इन्स्टिट्युटपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फाईव्ह नाईन चौक, एअरपोर्ट रोड, येरवडा येथील गुंजन चित्रपटगृह चौक, बंदगार्डन पुल, कोरेगाव पार्क उड्डाणपुल, क्विन्स गार्डन परिसर, भैरोबा नाला, क्रोमा चौक, वानवडी एसआरपीएफ, हडपसर या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल

वरिष्ठ पोलिस अधिकारी सकाळपासूनच लोहगाव विमानतळ, मांजरी व सिरम इन्स्टिट्युटमध्ये तळ ठोकुन आहेत. तर गुन्हे शाखेचे श्वान पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) व अन्य श्‍वान पथकांकडूनही संबंधित ठिकाणी कसुन तपासणी करण्यात आली. साध्या वेषातील पोलिस अधिकारी व कर्मचारी सुरक्षेसाठी संबंधीत परिसरात गस्त घालत होते.

रस्ते चकाचक !
पंतप्रधान मोदी यांच्या येण्याच्या व परतण्याच्या मार्गावर महापालिकेकडुन मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. रस्ते सफाई, रस्तयाच्याकडेला असणाऱ्या कचराकुंडी हलविण्यापासून ते खराब रस्त्यावर डांबर टाकुन ते दुरुस्त करण्यात आल्याचेही दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT