जुन्नर (पुणे) : ऐतिहासिक नाणेघाट व घाटघर परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. एकमेव विंधन विहिरीवर महिलांची गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत वन्य जीवांचे काय हाल होत असतील हे ओळखून वनकर्मचाऱ्यांनी प्राण्यांसाठी केलेली धडपड कौतुकास्पद आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नाणेघाट ता. जुन्नर येथील चितारकड्यातील दुर्लक्षित पाण्याच्या शिवकालीन टाकीतील संपूर्ण गाळ काढण्याचे काम जुन्नर वनपरीक्षेत्रामार्फत सोमवारी (ता.२६) रोजी पुर्ण करण्यात आले. या टाकीतून सुमारे अर्धा ट्रॉली गाळ माती काढण्यात आला. त्यानंतर टँकरच्या सहाय्याने टाकीत सोडण्यात येऊन पूर्ण टाकी पाण्याने भरण्यात आली.
दक्षिण कोरियाकडून किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा
या संवर्धनासाठी वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक रमेश खरमाळे, वनसेवक मारूती साबळे, साहेबराव बुळे, गणेश साबळे, संपत बोऱ्हाडे व महाबरे यांनी मोलाचे योगदान दिले. वन्यप्राण्यांसाठी हे सोडण्यात आलेले पाणी उपयुक्त ठरणार असून वन्यप्राण्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.