Student attendance in Purandar taluka is only 14 percent 
पुणे

पुरंदर तालुक्यात विद्यार्थी उपस्थिती 14 टक्केच; सहा शिक्षकच पाँझिटिव्हने चिंतेत भर

- श्रीकृष्ण नेवसे

सासवड : पुरंदर तालुक्यातील 70 विद्यालयांपैकी 36 विद्यालयात लाँकडाऊननंतर प्रथमच घंटा वाजली. मात्र केवळ 14 टक्केच विद्यार्थी कसेबसे आले. म्हणजेच 86 टक्के विद्यार्थी शाळेकडे फिरकले नाही. विशेष कोविड तपासणी अहवालात सहा शिक्षक पाँझिटिव्ह आढळल्याने आणखी चिंतेत भर पडली. अजून आठवडाभर शाळा सुरळीत होण्यास लागतील., अशी चिन्हे दिसताहेत.

''तालुक्यातील 34 विद्यालयात विद्यार्थी आलेच नाही. तालुक्यात 70 विद्यालयात नववी ते बारावी दरम्यान 11,900 विद्यार्थी पट आहे. पैकी आज पहिल्या दिवशी 1,755 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली,'' असे गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिवसभराची माहिती देताना स्पष्ट केले.

 5 स्टार हॉटेलमधून पार्सल मागवून शहा आदिवासी कुटुंबियांसोबत जेवले, ममता बॅनर्जींचा दावा

सासवड शहर व परिसरात आणि तालुक्यातही कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने बहुतांश पालकांनी पाल्यांना विद्यालयात पाठविले नाही. शिवाय कोविड चाचण्या वेळेत करण्यात काही शिक्षक कमी पडले, काही शिक्षक बाधितची चर्चा झाली, सुसंवादाचा अभाव, विद्यार्थी - पालक - शिक्षक संभ्रमात, दुसर्या लाटेची भिती... आदी कारणाने लाँकडाऊननंतर प्रथमच घंटा वाजली., मात्र केवळ 14 टक्केच विद्यार्थी कसेबसे आले. संमती पत्रे शाळा मागते पण शाळेनेही जबाबदारीची हमी द्यावी; असे पालकांचे मत आले. 

''नववी ते बारावी दरम्यानच्या शाळा भरत असल्या तरी ज्याला आँनलाईन शिकायचे.. त्याचा तो पर्याय खुलाच आहे. ज्यांची शाळा भरविण्याची मागणी व गरज आहे.. त्यांच्यासाठी शाळा पुन्हा सुरु होतायत'', असे गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड म्हणाले.

 हेही वाचा - भाजप करतंय २०२४ची तयारी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनी तयार केलाय प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

R. Ashwin: अश्विन क्रिकेटवर बोलत होता अन् अचानक घराबाहेर पोलीस आले; फोन उचलताच समोर आलं ‘ते’ कारण...

Success Story: 1.5 लाखांची नोकरी सोडली; देशी कोंबड्यांच्या व्यवसायातून आता वर्षाला 36 लाखांचा नफा!

Marathi News Live Updates : टीएमसीच्या माजी आमदारावर जमावाचा संताप; कोर्टात नेत असताना फेकली अंडी

Degloor Crime : ब्लॅकमेलिंग करून महिलेचे वारंवार लैंगिक शोषण; अश्लील फोटो व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित, आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT