The student died Injured in Tempo Traveller collision at VIT College in pune
The student died Injured in Tempo Traveller collision at VIT College in pune 
पुणे

पुणे : टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत जखमी झालेल्या विद्यार्थीनीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : परीक्षेसाठी महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थीनीस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ टेम्पो ट्रॅव्हलर अचानक वळताना विद्यार्थीनीस जोरदार धडक बसली. या अपघातात विद्यार्थीनीच्या डोक्‍याला व छातीस गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल केले, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यु झाला. ही घटना 21 नोव्हेंबरला दुपारी साडे बारा वाजता कोंढव्यातील ईस्कॉन मंदिराजवळील व्हिआयआयटी महाविद्यालयाजवळ घडली. 

ऐश्‍वर्या संतोष धांडेकर (वय 19, कोंढवा सासवड रोड, कोंढवा बुद्रुक) असे अपघातात मृत्यु झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी सदाशिव गुजले यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन बसचालक निखिल वानखेडे (रा.दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : पबजीमुळे अजित पवारला लागलं वेड!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्‍वर्या ही कोंढवा येथील विश्‍वकर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. 21 नोव्हेंबरला परिक्षा असल्याने ती दुपारी साडेबारा वाजता महाविद्यालयामध्ये पायी जात होती. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यानंतर आतमधून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच 11 बीएल 9490) अचानक वळविली. त्यावेळी बसच्या डाव्या बाजुची ऐश्‍वर्याला जोरदार धडक बसली. त्यामध्ये गंभीर जखमी झाली, मात्र चालकाने तिला रुग्णालयात न नेता तेथून पळून गेला.

मरणासन्न जिणं कंठणाऱ्या आजींना मिळाला ‘किनारा’ (व्हिडिओ)

दरम्यान, नागरिकांनी तिला भारती रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ व सुरक्षिततेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांकडून बुधवारी सकाळी अकरा वाजता महाविद्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ऐश्‍वर्याचे मामा अनिल जाधव यांनी दिली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT