पुणे

विद्यार्थ्यांनी बनविली पक्षांसाठी अफलातून घरटी

युनूस तांबोळी

टाकळी हाजी : सध्या उन्हाची तीव्रता आता वाढू लागली आहे. पाण्यासाठी पक्षांचे हाल होऊ नये तसेच त्यातून विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबाबत मित्रत्वाची भावना वाढीस लागावी, पर्यावरणविषयक आपुलकी निर्माण व्हावी यासाठी कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना बरोबर घेत कलात्मक घरटी बनविली. 

वातावरणात बदल होत असून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याचे दिसून येत  आहे. या काळात पक्षांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. अन्न पाण्याअभावी पक्षांना प्राण गमवावे लागू नये. यासाठी प्राचार्य शिंदे यांनी पक्षांसाठी अन्न पाण्याची सोय करता येईल का असा विचार केला. विद्यार्थ्यांच्या मनात पक्षांविषयी संवेदनशीलता व पर्यावरण विषयी आपुलकीची भावना तयार केली. त्यातून विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत. पक्षांच्या अन्नपाण्याची सोय केली आहे.

कलाशिक्षक दिपक मोरे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेऊन मुलांना पक्षांविषयी व त्यांच्या घरट्यांविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये पक्षांच्या प्रजाती वाढविण्यासाठी विशेष लक्ष देण्यास सांगितले. अन्न पाण्याबरोबरच त्यांना मिळणारे संरक्षण व त्यांच्यातील प्रजनन वाढीस मदत करण्यासाठी निसर्गातील सहवास या विषयी माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जवळपास 60 घरटी तयार करण्यात केली.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलात्मक या घरट्यांमध्ये अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यालयाच्या आवारात ही सगळी घरटी उंच ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे पर्यवेक्षक साहेबराव आंधळे यांनी सांगितले. या घरट्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. मॅझीक बस इंडीया फाऊडेशन यासाठी पुढाकार घेतला होता.

यावेळी विद्याविकास मंडळाचे अदय्क्ष जी. के. पुंडे, उपसरपंच संदिप तांबे, माजी सरपंच दादा खर्डे, प्रतिक शिर्के, मच्छिंद्र गायकवाड, उमेश साळवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पाच नैसर्गीक कलात्मक घरट्यांना बक्षीसे देण्यात आली. 

या वर्षी परीसरातील पाण्याची उपलब्धता पाहता कडक उन्हाळा जाणवणार आहे. त्यामुळे पक्षी संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या किंवा झाडांवर पाणी व धान्याची सोय करावी. त्यामुळे पक्षांना उन्हाळा जाणवणार नाही. -अजय खर्डे, अधिवासी विकास मंत्रालय कक्ष अधिकारी.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सरकार स्थापन करणार की राष्ट्रपती राजवट? राज्यपालांच्या एका निर्णयाकडे देशाचं लक्ष, आतापर्यंत अशा परिस्थितीत काय घडलं?

Thalapathy Vijay Opposition Leader Tamil Nadu : विजय थलपती मुख्यमंत्री नाही तर विरोधी पक्षनेता होणार?, भाजपकडून करेक्ट कार्यक्रम; तमिळनाडूचा रिमोट कंट्रोल मोदींच्या हाती

Suvendu Adhikari PA Murder : सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळ्या झाडून हत्या; तृणमूल काँग्रेसची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Rehabilitation News: धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार: मंत्री मकरंद पाटील, मंत्रालयातील बैठकीत महत्त्वाचे निर्णय, बेकायदेशीर जमीन वाटपाची होणार पुनर्तपासणी!

LPG Cylinder Price List: एलपीजी सिलिंडरच्या नवीन दरसूची जाहीर; घरगुती ते व्यावसायिक सिलिंडरची किंमत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT