Student 
पुणे

...म्हणून विद्यार्थ्यांनं शिक्षकांना पाठवलं पत्र!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही. म्हणून पत्र लिहित आहे. या जागतिक महामारीच्या संकटातही आपण सर्वजण आम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून ज्ञानाचे महान कार्य करत आहात, त्या बद्दल आपल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या, हीच नम्र विनंती", अशा शब्दांत एका विद्यार्थ्यांने शिक्षकांप्रतीच्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत.

मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या जमान्यात हल्ली पत्र पाठविणे कालबाह्य झाले आहे. कोणाला तरी पत्र पाठविले, असे कानावर पडत नाही ना? अहो, पण या अवलिया विद्यार्थ्यांने आपल्या शिक्षकांना शिक्षक दिनी चक्क पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. कै. श्री. वसंतराव वैद्य माध्यमिक विद्यालय येथे शिकणाऱ्या दयानंद सोनावणे या विद्यार्थ्यांने शिक्षकांना लिहिलेले पत्र सिटी पोस्ट येथील पत्र पेटीत टाकले. सध्या शिक्षकांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही. फोनवर देखील त्यांच्या प्रति आदर प्रेम व्यक्त करू शकत नाही, म्हणून त्याने चक्क आपल्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे.

दयानंद म्हणतो, "मला घडविणारे माझे शिक्षक आहेत. मला विचारांची समज आणि जीवनात ज्ञानाची भर त्यांनी घातली. मग मी कसे त्यांना विसरू? आज ही कोरोनामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटता येत नाही, नाहीतर नक्कीच मी त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले असते."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT