Exam 
पुणे

एटीकेटी किंवा बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला; पण...

सकाळवृत्तसेवा

पुणे - विद्यापीठांनी अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांचे निकाल लावण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये एटीकेटी किंवा बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारच्या नियमानुसार पुढच्या वर्गात प्रवेश दिला जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांना हा तात्पुरता दिलासा असून, पुढील १२० दिवसात परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कोरोना’मुळे राज्य सरकारने अंतिम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन व इतर वर्ष/सत्रात मिळालेल्या गुणांची सरासरी काढून पुढच्या वर्षात प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गणितीय पद्धतीने सरासरी काढून निकाल लावण्यास सुरूवात केली आहे. सरकारने सर्वांना उत्तीर्ण करण्याचा आदेश दिल्याने त्यात बॅकलॉग असलेल्या विषयांमध्ये उत्तीर्ण केले जाणार असा समज अनेक विद्यार्थ्यांचा झाला आहे. 

कायद्यानुसार पदवीच्या तृतीय वर्षात प्रवेश हवा असल्यास प्रथम वर्षातील सर्व विषयात उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. सध्या ज्या विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षातील बॅकलॉग आहेत, त्यांना सरकारच्या आदेशाप्रमाणे तृतीय वर्षात प्रवेश दिला गेला आहे. पण त्यांनी प्रथम वर्षाचे राहिलेले विषय उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. सध्या त्यांच्या गुणपत्रिकेवर ‘नॉट अप्लाइड‘ (एनए) असा शेरा दिला जात आहे.

कायद्यात तरतूद नाही
विद्यापीठ कायद्यात बॅकलॉगच्या विषयांची परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे परीक्षा द्यावी लागणार आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पहाता, ती परीक्षा कशी घ्यायची यावर अद्याप शासनाकडून निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्यांचे बॅकलॉग आहेत, त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवला पाहिजे, तरच त्यांना दिलासा मिळेल.

राज्य शासनाने ८ मे रोजी जे आदेश दिले आहेत. त्यानुसार बॅकलॉगचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘एनए’ असा शेरा दिला आहे. कोरोनामुळे ही परिस्थिती उद्भवल्याने त्या पुरतातच हा निर्णय लागू होत आहे. त्यामुळे पुढील १२० दिवसात या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागेल.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT