AKOLE.
AKOLE. 
पुणे

मुळशीतील शिक्षक दामप्त्याचे कौतुक, पतीनंतर पत्नीचीही शाळा टॅबयुक्त 

बंडू दातीर

पौड (पुणे) : राष्ट्रपती पदक विजेते मुख्याध्यापक संजीव बागूल यांनी दोन महिन्यांपूर्वी ते कार्यरत असलेली मुळशी तालुक्यातील कळमशेत येथील शाळा टॅबयुक्त केली. त्यानंतर अकोले (ता. मुळशी) येथील प्राथमिक शाळेत शिकविणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील त्यांनी टॅब मिळवून दिले आहेत. यामुळे आता अकोले येथील शाळाही आता टॅबयुक्त झाली आहे. 

कोरोनामुळे मुलांचा सध्या घरबसल्या ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. मात्र, नेटवर्कची रेंज आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे त्याच्या शिक्षणात अडथळा येतो. हे लक्षात घेऊन संजीव बागूल यांनी इन्स्टिट्यूट फॉर वूमन आंत्रप्रेनॉरियल या संस्थेकडून कळमशेतच्या कातकरी समाजातील सर्व मुलांना टॅब मिळवून दिले. त्यात चैतन्य सॉफ्टवेअरचा अभ्यासक्रमही डाउनलोड केला. त्यामुळे झोपडीतही ही मुले टॅबच्या साहाय्याने ज्ञानाचे धडे गिरवू लागली आहेत. 

बागूल यांच्या पत्नी विद्या या अकोले येथील प्राथमिक शाळेत शिकवितात. येथील उपसरपंच बाळासाहेब कुरपे, माजी सरपंच बाळासाहेब जाधव यांच्या सहकार्याने ही शाळा देखील टॅबयुक्त करण्याचा निश्‍चय बागूल यांनी केला. इन्स्टिट्यूट फॉर वूमन आंत्रप्रेनॉरियल या संस्थेने पाच, तर रोटरी क्‍लब ऑफ पुणे सेंट्रलचे सदस्य नरेंद्र संघवी यांच्या प्रयत्नातून या शाळेसाठी पाच टॅब मिळाले. सामाजिक कार्यकर्ते गणेश कुरपे यांनीही वडिलांच्या स्मरणार्थ एक टॅब दिला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टॅब मिळाल्याने त्यांचा अभ्यासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे या शिक्षक दामप्त्याचे तालुक्‍यात कौतुक होत आहे. 

या टॅबचे वितरण गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर यांच्या हस्ते झाले. या वेळी केंद्रप्रमुख मधुकर येनपुरे, प्रताप सुतार, अविनाश टेमघरे, लक्ष्मीताई सातपुते, बाळासाहेब कुरपे, मारुती कुरपे, दत्तात्रेय जाधव, बाळासाहेब जाधव, सुनील सातपुते, मधुकर सातपुते, संदीप सातपुते, गणेश कुरपे, मुख्याध्यापिका प्रभा परब, विद्या बागूल आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT