Omkar_Bane_HSC_Student 
पुणे

HSC Result 2020 : दिवसभर काम अन् रात्री शाळेत अभ्यास करत बनला 'टॉपर'!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, घरातल्यांना हातभार लागावा, यासाठी दिवसरात्र कष्ट करत रात्र प्रशालेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता या निकालानंतर उच्च शिक्षणात भरारी घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली आहे. सरस्वती विद्या मंदिर संस्थेच्या पूना नाइट हायस्कूल आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्यूनिअर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा निकाल ८१.४२ टक्के लागला आहे.

मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर निवळी येथील ओंकार बने हा दहावीनंतर पुण्यात आला. त्याने रात्र शाळेत पुढील शिक्षणाला सुरवात केली. पुणे-सातारा रस्त्यावरील एका खासगी कार्यालयात ऑफिस बॉयचे काम करत-करत त्याने अभ्यास सुरू ठेवला. घरातल्यांना हातभार लागावा, म्हणून ओंकार दिवसरात्र अथक परिश्रम घेत आहे. त्याचबरोबर त्याने वाणिज्य शाखेत ७९.८४ टक्के गुण मिळवित शाळेत अव्वल स्थान पटकाविले आहे.

स्वारगेट तेथील खासगी कंपनीत दिवसभर टेली कॉलरचे काम करण्याऱ्या पल्लवी जाधव हिने ७३ टक्के गुणांसह शाळेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. ती म्हणते, "माझी आई हाऊस किपिंगचे काम करते, आम्ही तीन भावंड आहोत. घर चालविण्यासाठी आईला थोडीफार मदत करणे शक्य होते, याचे समाधान आहे."

रात्र शाळेत आठवीपासून शिक्षण घेणाऱ्या चिन्मय मोकाशी या दिव्यांग विद्यार्थ्यांने ७४.६१ टक्के गुण मिळविले आहेत. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश ताकवले यांनी मार्गदर्शन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT