student 
पुणे

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नातून एअर लिफ्ट.... 

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर नुकतेच पुण्यात परतले. 

भारतातील शेकडो विद्यार्थी युक्रेनमधील केवायआयव्ही (KYIV) युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपल्याने त्यांना भारतात परत येणे गरजेचे होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर विमानसेवा बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी होती. या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी खासदार डॉ. कोल्हे यांना ई-मेल, व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक अशा विविध माध्यमातून संपर्क साधून मदतीची विनंती केली होती. 

डॉ. कोल्हे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद देत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार करुन 'वंदे भारत मिशन'अंतर्गत फ्लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर केंद्र सरकारने युक्रेनमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. त्यानंतर अन्य भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थीही परत येणे अपेक्षित असताना विमानात जागा देताना आपल्याला डावलण्यात येत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. 

डॉ. कोल्हे यांनी या तक्रारीची दखल घेऊन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व नागरी हवाई वाहतूक मंत्री पुरी यांच्याशी पुन्हा पत्रव्यवहार केला. डॉ. कोल्हे यांनी नेटाने व संयमाने परिस्थिती हाताळत पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस केवायआयव्ही (kyiv) युक्रेन- पुणे फ्लाईटमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार जवळपास ३०-४० विद्यार्थी गुरुवारी (ता. १८) पुण्यात परतले. आपल्याला परत येण्यासाठी मदत करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी डॉ. कोल्हे यांचे आभार व्यक्त केले. 

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, युक्रेनमधून ही पहिली बॅच भारतात परत आली असून, उर्वरीत सर्व विद्यार्थी परत येईपर्यंत आपण पाठपुरावा करणार आहोत. युक्रेन व्यतिरिक्त रशिया, किर्गिजस्तान येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठीही माझे प्रयत्न सुरू असून तेथील काही विद्यार्थी परतही आले आहेत.

नोकरी गमावलेल्या सौदी अरेबियातील महाराष्ट्रातील नागरिकांनीही परत आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. यापैकी अनेकांना 'वंदे भारत मिशन' अंतर्गत परत आणण्यात यश आले असले, तरी अद्याप खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील नागरिक परदेशात विविध ठिकाणी अडकले आहेत. यापैकी असंख्य लोकं माझ्याशी संपर्क साधत आहेत. त्यांना माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील आहे.                                - अमोल कोल्हे, खासदार

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT