Ministry-of-Education 
पुणे

विद्यार्थी बोलणार अन्‌ मंत्री ऐकणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा, तसेच विविध शिक्षण मंडळांच्या (बोर्ड) परीक्षा घेण्याबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची मते व सूचना जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा यंदा होणार, की नाहीत; परीक्षा झाल्या तर त्याचे स्वरूप काय असेल, असे नानाविध प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडले आहेत. मात्र परीक्षेचे नियोजन करताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांना सूचना, मते मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्‌विटरद्वारे हे आवाहन केले असून, त्याला प्रतिसाद देत पालक, शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी आपली मते, सूचना मांडत आहेत.

यामध्ये सीबीएसईच्या दहावी-बारावीचा आतापर्यंत ६०-६५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. उर्वरित अभ्यासक्रम अजून शिकणे बाकी आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण अजूनही पोचू शकलेले नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक लवकरच सोशल मीडियावर लाइव्ह येणार आहेत.

बोर्डाच्या परीक्षा मार्च की मे महिन्यात होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. तसेच ऑनलाइन वर्गात शिकताना नेटवर्क, कनेक्‍टिव्हिटी अशा समस्या डोके वर काढत आहेत. परीक्षेबाबत निर्णय घेताना सरकारने याचा विचार करावा.
- यश कुमार, विद्यार्थी

परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेचे साधारण वेळापत्रक काय असेल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना लवकरात लवकर कळणे आवश्‍यक आहे. 
- अमोल पवार, पालक

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT