निगडी - प्राधिकरण येथे ‘यिन संवाद’ कार्यक्रमात बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे.
निगडी - प्राधिकरण येथे ‘यिन संवाद’ कार्यक्रमात बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे. 
पुणे

बाह्यसौंदर्यापेक्षा बौद्धिक सौंदर्य वाढविण्याची गरज - सुनील टोणपे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘अपार मेहनतीच्या बळावरच युवकांनी आयुष्यात यश मिळवावे. तरुण वयातच व्यक्ती घसरते आणि सावरतेही. त्यासाठी जीवनात करिअरवर फोकस असला पाहिजे. आयुष्यात स्वतःला सिद्ध करायचे असेल तर बाह्यसौंदर्यापेक्षा बौद्धिक सौंदर्य वाढविण्याची गरज आहे,’’ असा सल्ला निगडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

निगडीतील डॉ. अरविंद ब. तेलंग कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयातील वालचंद संचेती सभागृहात ‘सकाळ यिन संवाद’ घेण्यात आला. प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील, समाजशास्त्र विभागप्रमुख विकास शेवाळे, पोलिस शिपाई विकास दराडे, धनंजय जाधव उपस्थित होते. 

टोणपे म्हणाले, ‘‘तरुणाईला मोबाईलचे व्यसन लागले आहे. अनेकदा रस्त्याने चालत असतानाही तरुणांना मोबाइलमुळे भान राहत नाही. त्यामुळेच गुन्हेगारीही वाढताना दिसत आहे. याला वेळेत आळा घालणे आवश्‍यक आहे. आयुष्यात तरुण-तरुणींनी फॅशन करावी; पण याला मर्यादा हवी. अंगप्रदर्शन करण्यात धन्यता मानण्यापेक्षा भारतीय संस्कृती जपण्यात समाधान माना. तसेच महिलांनी स्वतःवर होणाऱ्या अन्यायविरोधी अधिक आक्रमक व्हावे. धाडस अधिक वाढवावे. आरोग्य जपावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आई-वडिलांच्या संस्काराची किंमत ठेवा. आयुष्यात कमावलेली गुन्हेगारी स्वरूपातील संपत्ती ही आसुरी संपत्ती आहे.’’ 

कार्यक्रमाचे संयोजन अनुप द्विवेदी यांनी केले. प्रा. डॉ. शिवाजी शेळके यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT