Supreme_Court 
पुणे

सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला जामीन; बऱ्हाटेच्या अटकेचा कायदेशीर मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी आणि जागा नावावर करून देण्याची मागणी केल्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने देखील बुधवारी (ता.23) फेटाळला. यापूर्वी सत्र आणि उच्च न्यायालयानेही त्याचा अर्ज नामंजूर केला आहे.

न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश सुभाष रेड्डी आणि न्यायाधीश एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. बऱ्हाटे याने या गुन्ह्याचा कट रचल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. या प्रकरणात बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश हरिभाऊ जगताप (वय 49, रा.भवानी पेठ), पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन (वय 52, रा. प्रियदर्शन सोसा.सिंहगड रोड), दीप्ती आहेर (वय 34, रा. बावधन) आणि अमोल सतीश चव्हाण (चव्हाणवाडा, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे.

बऱ्हाटे याचा एफआयआरमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे सांगत बचाव पक्षाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास पोलिसांनी सरकारी वकिलांच्या माध्यमातून विरोध केला होता. बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांवर सुरवातीला कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर बऱ्हाटेसह इतरांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांपासून बचाव करीत फिरणाऱ्या बऱ्हाटे याने ओळखीच्या व्यक्तीची दुचाकी चोरल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे.

अटकेचा कायदेशीर मार्ग मोकळा :
गुन्हा दाखल झाल्यापासून बऱ्हाटे फरार आहे. पोलिस गेली अनेक दिवस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप तो सापडलेला नाही. त्याला फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील जामीन फेटाळल्याने बऱ्हाटेला अटक करण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT