Supriya Sule criticize Shinde group and BJP Pankaja Munde rebel eknath shinde 40 mla Sakal
पुणे

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांची उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडें प्रकरणी शिंदे गट व भाजपावर टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांचा पक्ष व त्यांचं चिन्ह काढून घेण्याचं पाप शिंदे गटाने केले आहे. हे दुर्दैव असून ते महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणारा

संतोष आटोळे

इंदापूर : उद्धव ठाकरे यांचा पक्ष व त्यांचं चिन्ह काढून घेण्याचं पाप शिंदे गटाने केले आहे. हे दुर्दैव असून ते महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणारा आहे.असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर तसेच एकीकडे बेटी पढाव आणि बेटी बचाव म्हणणारी बिजेपीचे लोक पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय करीत असून भारतीय जनता पार्टी त्यांना लेक मानत नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा वर जोरदार टीका केली.

सुळे सोमवार (ता.25) रोजी इंदापूर दौऱ्यावर आल्या असता पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्या निवासस्थानी युवा कार्यकर्ता संवाद बैठकीच्या प्रसंगी पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने, माजी सभापती प्रवीण माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे, किसन जावळे सागर मिसाळ,विठ्ठल ननवरे,छाया पडसळकर, भारत मोरे,किशोर माने यांच्यासह युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आमदार अपात्रताप्रकरणी आज सोमवार रोजी विधान भवनात सुनावनी पार पडली. यावर बोलताना खा.सुळे म्हणाल्या,स्पीकरच्या ऑफिसवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाने सांगितल्यावर तरी काहीतरी निर्णय होईल अशी आमची अपेक्षा होती.

जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती ते जिवंत असताना त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांवर दिली. ही पार्श्वभूमी असताना त्यांच्याकडून त्यांचा पक्ष त्यांचं चिन्ह काढून घेण्याचं पाप शिंदे गटाने केले आहे. हे दुर्दैव असून ते महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणारा आहे.अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेवर केली.

तर पंकजा मुंडें यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाई संदर्भात बोलताना खा.सुळे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे हयात नाहीत म्हणून त्यांच्या लेकीशी तुम्ही कसेही वागाल ? हा अन्याय आहे. कोणतही राजकारण न करता या राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिल.

पंकजा मुंडे यांचे वडिल गोपीनाथ मुंडे यांनी हयात असताना जेवढं भारतीय जनता पक्षाचे केले तेवढे करणारे महाराष्ट्रात नेते कमी असतील.सत्तेत नसताना पक्ष सत्तेत असण्यासाठी केवढे कष्ट केले. आज त्यांची मुलगी लढतेय.ती ज्या भारतीय जनता पक्षात आहे तो पक्ष त्यांच्यावर अन्याय करण्याचं पाप करतोय याचा मी जाहीर निषेध करत असल्याचे सांगितले.

तर भाजपाच्या एका दिल्लीतील खासदाराचे घर जीएसटी आणि टॅक्स प्रॉब्लेम मध्ये आले होते. मात्र भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा अदृश्य हाताने त्यांच्या घराचा लिलाव कसा थांबवला असा सवाल उपस्थित करीत एकीकडे बेटी पढाव आणि बेटी बचाव म्हणणारी ही लोक मग पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीची लेक नाही का ? असा प्रति सवाल ही खा. सुप्रिया सुळे यांनी भाजपाला केला आहे.

भर पावसात गणेश मंडळांना भेटी देत केल्या आरत्या..

दरम्यान खासदार सुळे यांनी भर पावसात फिजत इंदापूर शहरतील ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिर, राम मंदिर तसेच अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन रात्री उशिरापर्यंत गणरायाच्या आरती केल्या.

शिंदे गटाचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर

मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करून इंदापूर तालुका प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारलेले विद्यमान तालुकाप्रमुख महारुद्र पाटील हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या आजच्या दिवसभराच्या दौऱ्यात उघडपणे उपस्थित होते.यामुळे पाटील हे लवकरच राष्ट्रवादीशी घरवापसी करणार असे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT