supriya sule helps Poonam Fuse to meet her 1 year old baby after 1 month who stuck during the lockdown 
पुणे

Video : १ वर्षाचे बाळ एका महिन्यानंतर आईच्या कुशीत; 'अशी' झाली मायलेकराची भेट

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातील मगरपट्टा परिसरात स्थायिक असलेले संगणक अभियंते पुनम व सचिन
फुसे यांचा ११ महिन्यांचा मुलगा २० मार्चपासून मावळ येथे पुनम यांच्या आई- वडिलांकडे होता. दरम्याच्या काळात लॉकडाउन लागू झाला. तो १४ एप्रिलपर्यंत उठेल असा फुसे दांपत्याचा अंदाज होता. परंतु, तो ३ मे पर्यंत वाढला. त्यामुळे फुसे कुटुंब अस्वस्थ झाले. आपल्या बाळाला भेटण्यासाठाची पुनम यांची धडपड सुरू झाली. बाळदेखील आईच्या आठवणीने सारखे रडत होते. त्यामुळे आजी- आजोबांसह फुसे दांपत्य अस्वस्थ होते. सारखे रडत असल्यामुळे बाळाची तब्येतही खराब होत होती.



या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पूनम यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे यांच्यामार्फत संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून खासदार सुळे यांनी गृहखात्याशी संवाद साधला आणि पुनम यांना डिजिटल पास मिळण्यासाठी प्रयत्न केला. शहराची हद्द ओलांडली जाणार होती. सध्या शहरांच्या सीमा सील केल्या असल्यामुळे डिजिटल पास मिळणे जिकिरीचे होते. परंतु, सुळे यांनी हा प्रकार गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजवून सांगितला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अदिती नलावडे यांनी गृहखात्यात अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांकडे सुळे यांच्या सूचनेनुसार पाठपुरावा केला. अखेर फुसे दांपत्याला 20 एप्रिल रोजी पोलिसांकडून डिजिटल पास मिळाला. त्यानुसार त्या दांपत्याने 21 एप्रिल रोजी प्रवास करून बाळाला ताब्यात घेतले. योगायोगाने त्या बाळाचा पहिला वाढदिवस 21 एप्रिल रोजीच होता. बाळाने आईला पाहताच, आणि आईने बाळाला पाहताच, परस्परांच्या भावनांना वेग करून दिला. दोघेही रडू लागले. त्यानंतर फुसे दांपत्य सायंकाळी पुण्यात घरी सुखरूप पोचले.

Coronavirus : उरुळी कांचन : कोरोनाग्रस्त महिला इतरांच्या संपर्कात अन्...

या घटनेबाबत पूनम म्हणाल्या, "आम्हाला गरज होती, तेव्हा सुप्रिया सुळे अक्षरशः
देवासारख्या धावून आल्या. त्यांच्या मदतीमुळेच आमचे बाळ आमच्या ताब्यात आले. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मदत आम्ही कधीच विसरणार नाही."

केवळ दुध विक्री केंद्र दोन तासासाठी राहणार सुरू

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एका बाळाची आईची भेट होणे गरजेचे होते. त्यामुळेच माणुसकीच्या दृष्टिकोनातून आम्ही पोलिस प्रशासनाला विनंती केली. कोरोनाची परिस्थिती सध्या वेगळी असली तरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार संवेदनशील आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे."

पुण्यात फिरत्या दवाखान्यांमुळे सापडले कोरोनाचे 'एवढे' रुग्ण

बुलढाण्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजय खोत, मनिष बोरकर, पुण्यातील युवती
पदाधिकारी स्नेहल शिनगारे यांनीही यामध्ये सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषद लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी पूर्ण, राज्य महिला आयोगाला पाठवणार अहवाल

SCROLL FOR NEXT