Supriya Sule traffic police officers inspected flyover work Katraj Chowk pune sakal
पुणे

Pune News : वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसह सुप्रिया सुळेंनी केली कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कात्रज चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसह केली.

या पाहणी दौर्‍याच्या निमित्ताने सेवा रस्ते, कामात येणार्‍या इतर अडचणी व काम पूर्णत्वास जाण्यासाठी लागणारा वेळ याविषयी सविस्तर चर्चा करून अधिकार्‍यांना योग्य त्या सुचना करण्यात आल्या.

कात्रज-कोंढवा रस्त्याला हा पूल जिथे उतरतो त्या ठिकाणी परिसरतील नागरिकांना भेडसावणारी वाहतुक समस्या व त्यावर उपाय, तसेच कामाच्यावेळी कात्रज चौक येथे निर्माण होणार्‍या वाहतूक कोंडी संदर्भातही माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे, प्रतीक कदम यांनी उपाय सुचविले.

यावर तत्काळ उपाययोजना करत कात्रज चौक ते नवले पूलादरम्यान असणार्‍या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन सदर काम लवकरात लवकर पूर्ण करावे. त्याचबरोबर, यावेळी नवलेपूल ते कात्रज चौक रस्त्यावरील भुयारी मार्गाबाबतही आढावा घेऊन कामाला गती देण्याच्या सूचना सुळे यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या.

यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता महेश पाटील, शाखा अभियंता सलीम शेख, वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सागर पवार यांच्यासह माजी नगरसेवक प्रकाश कदम, काका चव्हाण, युवराज बेलदरे, सचिन दोडके उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे यांनी महामार्गाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर नवलेपूल ते कात्रज चौक रस्त्यावरील भुयारी मार्गाचे काम डिझाईन तयार करुन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच, कात्रज चौकातील उड्डाणपुलाचेही काम वेळेत पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. - सलीम शेख, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway route villages : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांची यादी आली; असा आहे मार्ग

Maharashtra Education DA Arrears: शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ महागाई भत्ता थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासह देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

Mumbai News : कुलगुरूंच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डीबाटू विद्यापीठाचे २०२५ मधील हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर

Gadchiroli Accident : अपघातात दांपत्याचा मृत्यू; सहा वर्षांची चिमुकली झाली पोरकी

SCROLL FOR NEXT