Crime
Crime 
पुणे

राज्य सरकारच्या नगररचना विभागाचा निलंबित सहसंचालकास अटक 

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरासह पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी बनावट दस्तऐवजाच्या आधारे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत अनेकांची फसवणुक केल्याप्रकरणी नगर रचना विभागाच्या निलंबित संचालकास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हनुमंत जगन्नाथ नाझीरकर ( वय 55, रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरूड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हयातील आरोपी नाझीरकर यास तत्काळ अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्या होत्या. नाझीरकर हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरारी होता. पुणे शहर,पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई या ठिकाणी गुन्हे दाखल असल्यामूळे तो काही महिन्या पासुन पोलिसाना गुंगारा देत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक त्यांचा कसोशीने शोध घेत होते. आरोपीस अटक करण्यासाठी अधिक्षक अभिनव देशमुख यांनी एक खास पथक तयार केले होते. या पथकालाही आरोपीचा ठाव ठिकाण्याबाबत काही एक धागादोरा मिळत नव्हता.

पुणे, सातारा जिल्ह्यातील आरोपीच्या वास्तव्याची ठिकाणे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले होते. त्यावेळी आरोपी हा महाबळेश्वर परिसरात असल्याची खबर मिळाली. त्या ठिकाणी जावुन त्याचा शोध घेतला असता, तो नाकींदा महाबळेश्वर परिसरात मिळून आला. त्यास ताब्यात घेतले घेऊन पुढील तापसाकामी बारामती शहर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर दत्तवाडी, अलंकार, आणि नवी मुंबई पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT