raju shetti main.jpg 
पुणे

प्रकृती बिघडल्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती बिघडल्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक रक्तदाब वाढल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

राजू शेट्टी यांनी नुकताच कोरोनावर मात करुन पुन्हा सार्वजनिक कामास सुरुवात केली आहे. त्यांना 9 सप्टेंबर रोजी कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी काही दिवस घरी विश्रांती घेतली होती.

अतिवृष्टीनंतर त्यांनी राज्यभरात दौरा करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाईची अशी मागणी केली होती. दिल्ली दौऱ्यावरुन बुधवारी सकाळी ते पुणे येथे दाखल झाले होते. 

सकाळी त्यांचा रक्तदाब वाढल्याने आणि दम लागत असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Explosion : काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १७ कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, म्हणाले...

Rally of Maharashtra 2026 : नाशिकमध्ये 'रॅली ऑफ महाराष्ट्र'चा थरार! मस्कारेहास डीन विजयाचा प्रबळ दावेदार, तर आदित्य ठाकूर स्पर्धेतून बाद

Pune : सायकल ट्रॅक निघाले पण झाडं रस्त्यातच; वाहतुकीला अडथळा, अपघाताची शक्यता

Nashik News : नाशिकमध्ये 'विरासत'चा जागर! अक्षय कुमारची रिक्षामधून ग्रँड एन्ट्री, एमईटी उत्सव जल्लोषात

Mohol News: मोहोळ येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरणी बारा संशयीत निष्पन्न करण्यात मोहोळ पोलीसांना यश

SCROLL FOR NEXT