Take care of the childerns who are becoming super spreader of corona virus 
पुणे

पालकांनो, ‘सुपरस्प्रेडर’ लहान मुलांची काळजी घ्या!

सम्राट कदम

पुणे : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. साथीच्या या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्येही कोरोना विषाणूचा प्रसार वाढला असून, सर्वांचेच लाडके असणारा हा बालचमू ‘सुपरस्प्रेडर’ म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे जरासे अनभिज्ञ असलेल्या लहानग्यांची या काळात विशेष काळजी घेण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. 

मागच्या वर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या या दुसऱ्या लाटेने सर्वांनाच प्रभावित केले आहे. कोरोना विषाणूतील हे नवीन उत्परिवर्तन (म्यूटेशन) लहान मुलांसाठी अधिक धोक्याचे ठरत असल्याचे डॉक्टर सांगतात. तसेच देशभरात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात लहानग्यांचा समावेश नाही. लहान मुलांना देता येईल अशी लस सध्या उपलब्ध नसल्याने सध्या खबरदारी हाच उपाय असल्याचे डॉक्टर सांगतात. विशेष म्हणजे बीसीजी आणि इतर लसीकरणामुळे लहानग्यांवर कोरोना विषाणूचा फार फार प्रादुर्भाव जाणवत नाही, मात्र त्यांच्या संपर्कात येणारे ज्येष्ठ नागरिक आणि घरातील इतर सदस्य कोरोना बाधित होऊ शकतात. 

हे वाचा - पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा; लशीचे डोस दिलेच नाहीत!

म्हणून लहानगे सुपरस्प्रेडर.... 
घरात सर्वांचे लाडके असल्यामुळे त्यांना कोणीही जवळ घेते. तसेच मास्क लावणे, अंतर ठेवून बोलणे, हात वेळोवेळी स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे सज्ञानच त्यांना नसते. ‘इंडोर गेम्स’ मध्ये मुलांचा एकमेकांशी संपर्क येतो. घरात कोणी कोरोना बाधित असल्यास लहान मुलांची चाचणी करून त्यांना आजी आजोबांकडे पाठविले जाते. सुरवातीला जरी चाचणी निगेटिव्ह आली तरी चार पाच दिवसांनंतर ती पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहानगे सुपरस्प्रेडर ठरतात, अशी माहिती मदरहूड हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारिख यांनी दिली. 

कोरोनाची लहानग्यांमधील लक्षणे ः 
- तापाबरोबरच सर्दी आणि खोकला 
- तापाबरोबरच उलट्या आणि जुलाब 
- अशक्तपणा आणि ताप 
- आठ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो 


हे वाचा - पिंपरीत 4 हजार 800चं रेमडेसिव्हीर 11 हजारांना; चौघांना अटक

अशी घ्या काळजी.. 
- आठ वर्षावरील मुलाला जर सहव्याधी (अस्थमा, स्थूलता, आदी) असेल तर त्याकडे विशेष लक्ष द्या 
- हात स्वच्छ ठेवणे, मास्क, दूर अंतरावरून बोलणे या गोष्टींचे लहान मुलांना शिकवा 
- दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेता मुलांचे इन्डोर गेमही टाळा 
- घरातील कोणी बाधित असल्यास लहान 
मुलांना ज्येष्ठांपासून दूर ठेवा 
- सकस आणि पौष्टिक आहाराकडे लक्ष द्या 


पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

लहान मुलांचे नुकतेच इतर आजारांसाठी लसीकरण झालेले असते. त्यामुळे त्यांच्यामधील रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. तसेच, कोरोना विषाणूवरील स्पाईक प्रोटीनला मानवी पेशीत घेणारे एसीई-२ हे एन्झाईम त्यांच्यामध्ये कमी प्रमाणात विकसित झालेले असते. पर्यायाने कोरोनाची बाधा झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये लक्षणे फारशी दिसत नाही. अशा वेळी त्यांचा संपर्क घरातील ज्येष्ठांशी येऊन त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे. 
- डॉ. तुषार पारिख, बालरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, पुणे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sugarcane : शेतकरी नेत्यांनी घसा कोरडा होईपर्यंत भूमिका मांडली पण कारखानदारांनी काय केलं?; साखर सहसंचालकही हतबल, ऊस आंदोलनाचं पुढं काय...

Latest Marathi News Live Update : सुप्रीम कोर्टात आज एसआयआर बाबत सुनावणी

मला कुणाचं नाव घेऊन बदनाम नाही करायचं... न सांगता रिप्लेस करण्यावर निशिगंधा वाड यांचे पती म्हणाले, 'विक्रम गोखले यांनी... '

दोन कोटींची लाच मागणाऱ्या PSIच्या घरात ५६ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने अन् मालमत्तेची कागदपत्रे; झडतीत काय सापडलं?

Video: प्राजक्ता माळीला काय झालय? रेड कार्पेटवर अशा का अवतारात आली? फोटोग्राफर्संना सुद्धा कळेना, नंतर म्हणाली...

SCROLL FOR NEXT