SPPU-Students 
पुणे

विद्यार्थी म्हणताहेत, 'आता चर्चा बास झाली, परीक्षेचे काय ते ठरवा!'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवर फक्त चर्चा आणि राजकारण सुरू आहे, पण विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार केला जात नसून, संभ्रम वाढत चालला आहे. त्यामुळे आता चर्चा खूप झाली, जो निर्णय आहे तो थेट घेऊन टाका, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. आता शहरी भागासोबत ग्रामीण भागात ही रुग्ण आढळून येत आहेत. अशा स्थितीत जुलै महिन्यात परीक्षा घेतल्यास आणखी धोका निर्माण होईल, अशी भीती विद्यार्थी संघटना तसेच राज्य सरकारला वाटत आहे, त्यामुळे यापूर्वी अंतिम वर्षाची परीक्षा घेतली जाईल असे स्पष्ट केले असताना राज्य सरकार स्वतःचाच निर्णय रद्द करण्याच्या तयारीत आहे. पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यास विरोध केल्याने निर्णय होऊ शकला नाही.

त्यातच नॅशनल असेसमेंट ऍण्ड ऍक्रिडिएशन कौन्सिलतर्फे आयोजित वेबीनारमध्ये देशातील सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यात येणार आहे, पण संबंधित राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता तेथील राज्य सरकार व विद्यापीठांनी परीक्षेसंदर्भात योग्य तो विचार करावा, असे असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले. त्यावरून आता परीक्षा होणार की नाही, असा संभ्रमात विद्यार्थी आहेत.

सिद्धार्थ तेजोळे म्हणाले, "परीक्षा रद्द करा ही विद्यार्थ्यांची मागणी आहे, पण गेले काही दिवस यावर केवळ चर्चा चालू असलेल्या संभ्रम वाढत चालला आहे. विद्यार्थी-पालक यांच्या मानसिकतेचा विचार करून लवकर निर्णय घ्यावा." 

शिल्पा साळवे म्हणाल्या, "शेवटचे वर्ष असल्याने यावेळी चांगले गुण घेणे गरजेचे आहे. पण परीक्षा होणार की नाही हेच कळत नसल्याने अभ्यासातही लक्ष लागत नाही. याबाबत चर्चा खूप झाली, जो काय निर्णय घ्यायचा तो त्वरीत झाला पाहिजे."

"परीक्षा होणार की नाही हे स्पष्ट केले तर आम्हालाही पुढील तयारी करता येईल. राज्य सरकारने निर्णयातील संभ्रमात संपवली पाहिजे", सिद्धांत माळोदे  यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, भोरमध्ये संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT