पुणे

पुण्यातील लाॅकडाउनबाबत मोठा निर्णय; अजित पवारांनी काय दिले संकेत?

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी दोन किंवा तीनपेक्षा अधिकारी लोकांनी एकत्र फिरण्यावर निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, पुण्यात तूर्त लॉकडाउन होणार नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिले. पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदी लागू करण्याबाबत दोन्ही शहरांचे महापौर, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून प्रशासनाने निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले. 

लॉकडाउनचा धसका शहरातील नागरिकांना बसला आहे. महापालिकेने जमावबंदीचा आदेश लागू केल्यामुळे शहरात अफवांना उत आला आहे. पुन्हा लॉकडाउन होण्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील जमावबंदीच्या आदेशाबाबत पवार यांनी लोकप्रतिनिधींकडे चेंडू टोलावला तर, पुण्यात पुन्हा लॉकडाउन होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. शहरात दुसऱ्यादा झालेल्या लॉकडाउनला उद्योग जगतासह विविध व्यापारी संस्था- संघटनांनीही तीव्र विरोध केला होता. या पार्श्‍वभूमीवर विधानभवन सभागृहात पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शुक्रवारी आढावा घेतला.

शहरी भागासह ग्रामीण भागातील 'कोरोना'चा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे असून यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. 'कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्‍सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. येथील ऑक्‍सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करुन घ्यावीत अशी सूचना करुन नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात गृह सर्वेक्षणावर भर देवून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम प्रभावीपणे राबवावी. यात लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था व नागरिकांना सहभागी करुन घ्यावे असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हिसीद्वारे), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अशोक पवार, आमदार सुनिल शेळके, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त तथा ससून रुग्णालयाचे समन्वय अधिकारी एस. चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला, वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT