The tanker driver is taking care 12 people who stuck in lohagav during lockdown 
पुणे

अशी ही माणुसकी ! टँकरचालक करतोय डझनभर लोकांचा सांभाळ

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोहगावची जत्रा कोरोनामुळे रद्द झाल्याने आकाश पाळणा व इतर खेळण्या घेऊन आलेल्या व्यवसायिकांच्या खेळणीचे चक्र फिरण्यापूर्वीच बंद पडले. त्यांचा जवळ असेलेला पैसा ही संपला. त्यांचे होणारे हाल बघून टँकरचालकाने स्वत: तीन कुटूंबातील १२ जणांची जबाबदारी घेऊन त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.उमेश पाटील असे या टँकरचालकाचे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१७ मार्च रोजी लोहगावचे ग्रामदैवत मानले जाणारे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा उत्सव असतो. त्यानिमित्त मोठी जत्रा भरते. त्यासाठी अनेक खेळणी, वस्तू विक्रेते दाखल होतात. जत्रेत मोठे आकाश पाळणे, कोलंबो जहाज, ड्रॅगन यासारखे मोठी खेळणी उभारण्याचे काम सांगोला तालुक्यातील वेडेगाव येथील व्यवसायिक करत होते. 

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

जत्रा सुरू व्हायच्या आधी पुण्यात कोरोनाचे संकट गडद होत असल्याने ग्रामस्थांनी जत्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या व्यावसायिकांवर मोठे संकट निर्माण झाले. 
त्यांनी फिटिंग केलेली मोठी खेळणी उतरविण्याचे काम सुरु केले, पण तो पर्यंत लाॅकडाऊन जाहीर झाल्याने सुमारे ४० जण अडकून पडले. त्यातील काही जण कसेबसे गावाकडे निघून गेले. मात्र ही अवाढव्य खेळणी नेण्यासाठी ट्रक मिळत नसल्याने त्यांचा सांभाळ करण्यासाठी तीन कुटुंब लोहगावातच थांबली. त्यांची खाण्यापिण्याची गैरसोय होत असल्याचे लक्षात आपल्याने उमेश पाटील यांनी या कुटुंबांची व्यवस्था केली, त्यांना रहाता यावे यासाठी मोकळ जागा दिली. गेले महिनाभर ते या कुटूंबांना सांभाळत , पण लाॅकडाऊन संपत नसल्याने त्यांना भविष्यात मदत कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Coronavirus : पुण्यातून कोरोनाचा होऊ शकतो नायनाट; पण...

"गेले महिनाभर पदरमोड करून तर कधी मदत जमवून १२ जणांची जेवणाची व्यवस्था केली. लाॅकडाऊन अाणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे अडचणी वाढत आहेत. जत्रा रद्द झाल्याने या व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्याकडे आता पैसा नाही. त्यामुळे यांना मदत होणे आवश्यक आहे."
- उमेश पाटील, लोहगाव

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

DMart New Sale : नवा आठवडा, नवा सेल! डीमार्टमध्ये उद्यापासून स्पेशल ऑफर सुरू, कोणत्या वस्तू मिळणार जास्त स्वस्त? पाहा एका क्लिकवर

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT