पुणे

हिवरे तर्फे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या नळपाणी पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित

रवींद्र पाटे

नारायणगाव : थकित वीज बिलाचा भरणा न केल्याने  हिवरे तर्फे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या नळपाणी पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. बारमाही बागायती म्हणून नावलौकिक असलेल्या गावात  पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने  ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हिवरे तर्फे नारायणगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या साडेचार हजार आहे. विंधन विहिरीतील पाणी बारवमध्ये साठवून ग्रामस्थांना नळपाणी पुरवठा केला जातो. विंधन विहिरीच्या वीज बिलाची १ लाख ४ हजार रुपयांची थकबाकी आहे. ५० टक्के वीज बिल सवलत योजनेचा लाभ घेऊन बहात्तर हजार रुपयांची वीज बिल थकबाकी भरणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायतने वीज बिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीने सोमवारी वीज पुरवठा खंडित केला.

दरम्यान, या बाबत सरपंच सोमेश्वर सोनवणे म्हणाले मी ९ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.त्या नंतर माहिती घेतली असता ग्रामपंचायत मध्ये पुरेसा निधी शिल्लक नसल्याचे मात्र देणेदारी असल्याचे दिसून आले. मागील तीन वर्षाची ग्रामपंचायतची सत्तावीस लाख रुपयांची थकित करवसुली झाली नाही.अनागोंदी कारभारामूळे ग्रामस्थ कर भरण्यास तयार नाहीत. रस्त्याचे काम न करताच ठेकेदाराला सुमारे दीड लाख रुपयांचे बील देण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे फर्निचर, ग्रील, दिवे, माऊली इलेक्ट्रॉनिक, ठेकेदाराची बिले, मासिक मिटींगसाठी वडापाव,चहा आदींची सुमारे १५ लाख रुपयांची थकबाकी देणे आहे. वीज बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये पैसेच शिल्लक नसतील तर ग्रामपंचायतीचा कारभार कसा करायचा, ग्रामस्थांना पाणी, स्वच्छता, आरोग्य आदी सुविधा कशा पूरवयाच्या  असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांचा विश्वास संपादन करण्यासाठी मागील पाच वर्षात झालेल्या ग्रामपंचायतिच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी.गैरकारभार आढळल्यास दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नवनिर्वाचित सरपंच सोनवणे यांनी केली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT