Tarabai_Shedge 
पुणे

शेडगे आक्कांची कमाल; ८८ व्या वर्षी कोरोनावर केली मात!

कृष्णकांत कोबल

मांजरी (पुणे) : प्रबळ इच्छाशक्ती आणि जीवन जगण्याची कला जवळ असेल, तर कोणतीही लढाई जिंकण्यासाठी मोठी मदत होत असते. सातववाडी येथील ८८ वर्षीय श्रीमती ताराबाई शेडगे या वयोवृध्द महिलेने लढून कोरोनाला हरविण्याचा पराक्रम केला आहे.

सतत उत्साही आणि आनंदी असणाऱ्या ताराबाई यांना परिसरात शेडगे आक्का म्हणून ओळखतात. त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यावर घरातील इतरांचीही तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये इतर दोघांबरोबर शेडगे आक्काही पॉझिटिव्ह निघाल्या.

येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरसे यांनी पालिकेच्या हडपसर येथील आण्णासाहेब मगर रुग्णालयातील डॉ. स्नेहल काळे यांच्याशी समन्वय साधून आक्कांना कोथरूड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी जागा उपलब्ध करुन दिली. शेडगे आक्कांनी कोरोनाचे हे आव्हान स्वीकारले आणि धीरोदात्तपणे त्या त्याला सामोऱ्या गेल्या. तेथील बारा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

एवढ्या वयातही त्यांनी कोरोनावर जी मात केली ती अचंबित करणारी असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, त्या रुग्णालयातून घरी परतल्यावर प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, विशाल वाळके आदींनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. नागरिकांनीही टाळ्या वाजवून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शेडगे आक्का सकारात्मक उर्जेच्या आहेत. वयोवृद्ध असूनही उपचारादरम्यान त्यांनी चांगले सहकार्य केले. उपचारानंतरही काळजी न करता त्या हसून खेळून असत. कायम उत्साही असल्यामुळे त्यांची सेवा करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांशी त्यांचे चांगले नाते निर्माण झाले होते, अशी भावना रूग्णालयातील अधिकारी अमृता साने व जनसंपर्क अधिकारी विजय गायकवाड यांनी व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT