A team of Pune police arrested the two In Pooja Chavan death case 
पुणे

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण; पुणे पोलिसांच्या पथकाने दोघांना घेतले ताब्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे :  टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यूचे गुढ अद्याप समोर आले नाही, दरम्यान या प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात  घेतले आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींपैकी एक जण अरुण राठोड याच्या जवळील व्यक्ती असल्याची माहिती मिळत आहे.  दरम्यान, या प्रकरणाची गांभिर्याने दखल घ्यावी यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांना पत्र पाठविले होते. 

आणखी वाचा - पूजा चव्हाणच्या मोबाईलमध्ये दडलंय काय?

पूजा चव्हाण हिने काही दिवसांपूर्वी वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये महाआघाडीतील एका मंत्र्याचे नाव जोडले गेल्याने त्यावरुन मोठ्या प्रमाणात राजकीय आरोपांच्या फैरी झडल्या. दरम्यान, काही व्यक्तींनी संबंधीत प्रकरणाबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्‌विटरद्वारे कळवून त्यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी स्वतः लक्ष घालत पुणे पोलिसांना या प्रकरणाचा आत्तापर्यंत काय तपास केला, याबाबतचा चौकशी अहवाल तत्काळ पाठविण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले होते.

आणखी वाचा - पूजा चव्हाणच्या हत्येचा कट? भाडेकरारापासून आत्महत्येचा घटनाक्रम काय सांगतो?

दरम्यान आज यवतमाळ आणि परळीत गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. बेपत्ता अरुण राठोड याला शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT