Jica 
पुणे

पुणे महापालिकेचा अजब कारभार; जागा ताब्यात नसतानाही निविदा मागविल्या

सकाळवृत्तसेवा

पुणे - जागा ताब्यात आल्याशिवाय निविदा काढू नका, असे केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने वारंवार सांगूनही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष करीत निविदा काढल्या आहेत. विशेष म्हणजे निविदेसाठी इस्टिमेट कमिटीची बैठक ११ फेब्रुवारी रोजी झाली. मात्र, त्याचे इतिवृत्त १६ मार्च रोजी मंजूर केले. परंतु २५ फेब्रुवारीलाच निविदेची जाहिरात काढण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ११ ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी जाहिरात काढून महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. या निविदा भरण्याची अंतिम मुदत २८ एप्रिलपर्यंत दिली आहे. वास्तविक शंभर टक्के जागा ताब्यात असल्याशिवाय निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे जलशक्ती मंत्रालयाने २३ फेब्रुवारीला महापालिकेला पत्राद्वारे कळविले. असे असतानाही महापालिका प्रशासनाने २५ फेब्रुवारीला निविदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली. वास्तविक ११ पैकी अद्यापही पाच प्रकल्पांच्या जागा पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत.

असे असतानाही महापालिका प्रशासनाने निविदा मागविण्यासाठी धडपड का केली?, असा प्रश्‍न ‘सकाळ’च्या हाती आलेल्या इस्टिमेट कमिटीच्या मिनिटस्‌वरून समोर आला आहे.

चौकशी होणार का?
केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्रालय आणि जायकाने वारंवार सांगूनही महापालिका प्रशासन अटी व शर्तींचा भंग करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यातून प्रकल्पाचा खर्च वाढतच चालला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना चाप लावण्याचे काम आयुक्त आणि सत्ताधारी भाजप करणार काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Latest Marathi News Live Update : मोर्चासाठी ठाण्यातून शिवसैनिक-मनसैनिक मुंबईकडे रवाना

Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT