corona  
पुणे

पुरंदरकरांचे टेन्शन वाढले, आता या गावातही पोचला कोरोना 

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील बोपगाव या मूळगावी मुंबईहून आलेले एक रसवंती व्यवसायिक रक्तदाब व मधूमेहाच्या त्रासातून दोन दिवसांपूर्वी पुण्यात रुग्णालयात गेले. मात्र, आज त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचाच अहवाल आला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 18 वर पोचली आहे. यातील सात रुग्ण केवळ या एका आठवड्यात सापडले, अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी दिली.

बोपगावचा हा रुग्ण हात मोडला म्हणून गावाकडे कुटुंबीयांकडे आला. मात्र, रक्तदाब व मधूमेहाच्या त्रासातून रुग्णालयात दाखल झाले; अन् कोरोनाचा शिरकावा पुढे आला. त्यातून बोपगावात संबंधीत भाग कंटेन्मेंट झोन करण्याची कार्यवाही सुरु आहे. कुटुंबिय व संपर्कातील क्वारंटाइन केले आहेत.

दरम्यान, सासवड शहरात राहणारे व पुणे महापालिकेच्या कोरोना वाॅररुममध्ये सेवा बजावणाऱ्या एका कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाल्याचे काल स्पष्ट झाले. लक्षणे दिसल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवून रुग्णास पुण्यातील रुग्णालयातही दाखल केले. त्यामुळे सासवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या तीनवर आणि बोपगावसह तालुक्यातील रुग्णांची संख्या 18 वर पोचली आहे. 

तालुक्यासाठीच्या सासवड येथील एका शासकीय कार्यालयाचा वाहनाचा चालक चार दिवसांपूर्वीच कोरोना तपासणी अहवाल पाॅझीटिव्ह आला होता. त्यास पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याच्या संबधीत कार्यालयातील 24 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा या कर्मचाऱ्यांना मिळाला आहे.

मात्र मुंबई कनेक्शनमधील गुरोळी (ता.पुरंदर) गावातील एकाच कुटुंबातील सहाजण कोरोना पाॅझीटिव्ह निघाले. मात्र त्याच कुटुंबातील तीनजण मात्र तपासणीत निगेटिव्ह आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
 दरम्यान, सासवडचा पाॅझीटिव्ह रुग्ण बर्‍यापैकी होम क्वारंटाइन असल्याने जे काही संपर्कातील लोक असतील त्यांची संख्या मर्यादित आहे. एकुण 18 पैकी मुंबई कनेक्शनमधील 13 आणि पुणे कनेक्शनधून 5 रुग्ण येथे सापडले. त्यामुळे या दोन्ही कनेक्शनमधील लोकांबाबत संस्थात्मक किंवा होम क्वारंटाइन बाबत गांभीर्यपूर्वक विचार न केल्यास कोरोनामुक्त तालुका शक्यच होणार नसल्याचे स्पष्ट आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिम बंद केलं, आठवड्यात साहित्य विकायचं होतं, दगडूशेठ मदतीला धावला... 'कृष्णाईच्या लेकी' अभिनेत्याने सांगितला अनुभव

Gangapur Maize Crop Crisis : करपलेली मका मुरघाससाठी विकण्याची वेळ ; उत्पादन खर्चही निघणे कठीण; पश्चिम महाराष्ट्र-कर्नाटकातून चाऱ्यासाठी मागणी

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुंबई-पुण्यात गणेश विसर्जनाची लगबग; वाहतुकीपासून मिरवणुकीपर्यंत प्रत्येक अपडेट LIVE

Kolhapur Mumbai Special Train : दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून कोल्हापूर ते मुंबई, कलबुर्गीसाठी विशेष गाड्या जाहीर; पाहा रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक

Gyanesh Kumar Petition : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ; थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल, 'ते' 14 निर्णय वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT