covid19 Sakal Media
पुणे

सोनवडी सुपेतील 87 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

त्यांना बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विजय मोरे

उंडवडी : सोनवडी सुपे (ता. बारामती) येथील 87 वर्षीय आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यांना नुकतेच रुग्णालयातून घरी सत्कार करुन पाठवण्यात आले. वेळेत औषध-उपचार केल्यानंतर आणि विशेष खबरदारी घेतल्यानंतर कोरोनावर सहज मात करता येवू शकते, हेच पुन्हा एकदा आजोबांनी दाखवून दिले आहे. येथील कष्टाळू शेतकरी म्हणून ओळख असलेले जेष्ट नागरीक वामन साहेबराव मोरे (वय. ८७) यांना दहा-बारा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर त्यांना बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (the 87-year-old grandfather was cured in corona infection)

त्यांची ऑक्सिजन पातळी 77 वर आली होती. तर एच. आर. सी. टी स्कोअर 11 आला होता. त्यानुसार येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. सदानंद काळे यांनी त्यांची तपासणी करुन गोळ्या औषधे दिले होते व त्यांना माळेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाठवले होते. तेथे त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने औषधे घेतल्यानंतर ते आठ दिवसातच ठणठणीत झाले. नुकतेच वामन मोरे यांना घरी सोडण्यात आले असून, दरम्यान माळेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर घरी आल्यानंतर कुटूंबाने देखील त्यांचा सत्कार केला.

याबाबत बोलताना सोनवडी सुपेचे उपसरपंच फत्तेसिंग गोंडगे म्हणाले, "मी स्वत: बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये आजोबांना घेवून गेलो होतो. तेथे डॉ. सदानंद काळे यांनी आजोबांच्या वयाचा विचार करुन तातडीने त्यांच्या तपासण्या करुन ऑक्सिजन बेड देवून उपचार केले. आजोबांना डॉ. काळे यांनी केलेल्या उपचारामुळेचं खऱ्या अर्थाने जीवदान मिळाले. त्यामुळे त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत." याबाबत माळेगाव येथील कोविड केअर सेंटर वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन राऊत म्हणाले" आम्ही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजोबा वामन मोरे यांच्यावर उपचार केले. आजोबांचे वय जास्त असल्यामुळे आम्ही त्यांना आमच्या निरीक्षणाखाली ठेवून औषधे उपचार केले. त्यांनी औषधे व जेवण वेळेत करुन गोळ्या औषधांना चांगला प्रतिसाद दिला. दोन -तीन दिवसात त्यांची प्रकृती ठणठणीत बरी झाली. आजोबा बरे झाल्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद झाला. आमच्याकडे सर्वच रुग्ण लवकर बरे व्हावेत. यासाठी आमचे कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT