crime  sakal
पुणे

पलायन केलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

सात दिवसा नंतर आरोपी हाताला लागल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.

अमर परदेशी

वरवंड : यवत पोलिसांच्या ताब्यातुन पळुन गेलेल्या आरोपीला पकडण्यात पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व यवत पोलिस पथकाला अखेर यश आले. सात दिवसा नंतर आरोपी हाताला लागल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. आबासाहेब सुखदेव बाबुल असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला शनिवारी (ता.४) मध्यरात्री त्याच्या जळगाव जिल्ह्यातील मुळ गावी शिवरी येथुन एका बाजरीच्या शेतातुन ताब्यात घेतले. अशी माहीती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

यवत पोलिस ठाण्यात संबधीत आरोपी आबासाहेब बाबुल यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिसांनी जळगाव मधुन त्याला अटक केली होती. मागील आठवडयात २८ आॅगस्टला यवत पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचारी दौंड न्यायालयातुन आरोपीला पोलिस यवत पोलिस ठाण्यात घेवुन जात होते. वरवंड हद्दीतील एका हाॅटेलमध्ये पोलिस नाष्टा व चहासाठी आरोपीला घेवुन थांबले होते. त्यावेळी आरोपीने मोठया शिताफिने पोलिसांच्या तावडीतुन पलायन केले. माहीती मिळताच पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलिस अधिकाऱी व पोलिस फौजफाटा घेवुन लोकांच्या सहकार्याने आरोपीचा शिवारातील उसाच्या शेतात शोध घेतला. मात्र,रात्रभरातील शोध मोहीमे नंतरही पोलिसांच्या पदरी निराशा पडली.

यवत पोलिस व पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची एकुण तीन पथके आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती. अखेर सात दिवसाच्या अथक प्रयत्ना नंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले. खबऱया मार्फत आरोपी जळगाव जिल्ह्यातील त्याच्या मुळ गावी शिवारी येथे असल्याची माहीती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी (ता.४) मध्यरात्री आरोपीला एका बाजरीच्या शेतातुन सापळा लावुन मोठया शिताफिने ताब्यात घेतले.

सहायक पोलिस निरीक्षक संदीप येळे,तुषार पंदारे,जनार्दन शेळके,मनिष ठिगळे,दत्तात्रेय खाडे,निलेश कदम,गुरु गायकवाड,सोमनाथ सुपेकर या पोलिसांनी ही कामगिरी बजावली. पळून गेल्याचा अतिरिक्त गुन्हा दाखल करून आरोपीला शनिवारी दुपारी दौंड न्यायालयात हजर करण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : ‘एफडीए’ची कॅम्प, एमजी रोडवरील २० हॉटेलची तपासणी; ॲमेझॉन, बिग बास्केट च्‍या गोडावूनवरही छापे

Baramati Crime : बारामतीत खंडणीच्या मागणीसाठी डिफेंडर गाडीवर गोळीबार; शिवशंभूनगर परिसरात खळबळ

Family Court Divorce Ruling : पोटगीचे साडेसहा लाख घेऊनही पत्नीचा घटस्फोटाला नकार; 'यू-टर्न' प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल, पतीचा अर्ज मंजूर!

पुढच्या सहा महिन्यात शनीचं मोठं राशीपरिवर्तन! दोन राशींना दिलासा, तर दोन राशींच्या अडचणी वाढणार

Latest Marathi News Live Update: जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

SCROLL FOR NEXT