research in baramati  Sakal Media
पुणे

बारामतीकर डॉक्टरांच्या संशोधनाची जर्नल फ्रंटीयर्सने घेतली दखल

डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद व सहकाऱ्यांनी केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त

मिलिंद संगई, बारामती

बारामती : हळदीमध्ये आढळणारा 'करक्युमीन' हा पोषक घटक व काळी मिरी यांचे मिश्रण असलेले औषध कोरोना होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये उपचार म्हणून व कोरोनाचे शरीरावर होणारे दूरगामी घातक परिणाम टाळण्यासाठी उपयोगी ठरू शकते. बारामतीच्या डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी ( Frontiers in Pharmacology)यामध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या संदर्भात डॉ. कीर्ती पवार म्हणाल्या, ''बारामती येथील सार्वजनिक रुग्णालयात इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च (ICMR)यांची मान्यता मिळाल्यानंतर करक्युमीन या औषधाची क्लिनीकल ट्रायल 140 रुग्णांवर घेण्यात आली. यात सौम्य लक्षणे, मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा समप्रमाणात सहभाग होता.

रुग्णालयात दाखल होताना रुग्णांची शरीरात असलेली ऑक्सिजनची पातळी यावरून करोनाबाधित रुग्णांची सौम्य, मध्यम व तीव्र लक्षणांमध्ये विभागणी करण्यात आली. अशा रुग्णांच्या एका समुहाला कोव्हीड टास्क फोर्सने निर्देशित केलेली ओषधे देण्यात आली तर दुसऱ्या समुहाला कोव्हीड टास्क फोर्सने निर्देशित औषधांसोबत करक्युमीन 525 एमजी व बायोपेरीन अडीच एमजी (म्हणजे हळद व काळी मिरी याचे योग्य मिश्रण असलेले ) हे औषध दिवसातून दोन वेळा देण्यात आले.

निष्कर्ष :

•करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रणयुक्त गोळ्या दिलेल्या रुग्णांमध्ये

ताप, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे कमी होऊन रुग्ण लवकर बरे झाले,

•हे औषध घेणा-या रुग्णांमधील गंभीरतेचे प्रमाण खूप कमी झाले,

• हे औषध न दिलेल्या रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी 7 ते 27 दिवस होता तर करक्युमीन घेतलेल्या रुग्णांचा 5 ते 10 दिवस होता.

• करक्युमीन घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज कमी भासली.

• तसेच कृत्रिम श्वसनाचे मशीन लावण्याची गरजही कमी झाली.

• रुग्णालयात दाखल होताना मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हीरची गरज कमी लागली.

• मध्यम व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांमधील मृत्युदर कमी झाला.

• रक्त पातळ करणाऱ्या हेपॅरिन या इंजेक्शन बरोबर करक्युमीन दिल्यास फायदा होतो व कोणतेही दुष्परिणाम होत नाही हे सिध्द झाले.

• या हळदीच्या गोळीमुळे रक्त न गोठता प्रवाही राहण्यास मदत झाल्यामुळे कोव्हीडमुळे फुफ्फुसावर होणारे दुष्परीणाम, ह्रदयाच्या, फुफ्फुसाच्या व शरीरातील रक्तवाहिन्यांमध्यें होणाऱ्या गुठळ्या, असे घातक दुष्परिणाम टाळण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली.

• कोविड होऊन गेल्यावरही पुढील 3 महिने या गोळीचा मर्यादित स्वरूपात वापर करून कोव्हीडमुळॆ होणारे दुरगामी परिणाम (Thrombo - embolic complications) टाळण्यासाठी मदत होऊ शकते याचा शास्त्रीय पुरावा या संशोधनदवारे मांडण्यात आला.

डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद, डॉ. सतीश पवार, सम्राज्ञी पवार, डॉ. रमेश भोईटे, डॉ. राहुल भोईटे, डॉ. मीनल कुलकर्णी व संख्याशास्त्रज्ञ आदिती देशपांडे यांच्या चमूने केलेले हे संशोधन औषधशास्त्रातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी यामध्ये प्रसिद्ध झाले आहे. यामुळे भारतातीलच नाही जगभरातील कोविड रुग्णांमधील उपचारासाठी मदत होणार आहे. या संशोधनामुळे शासकीय व वैदयकीययंत्रणेवरील ताण कमी होण्यास मोलाचे योगदान मिळू शकते असा आशावाद व्यक्त होत आहे. करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रण असलेली गोळी यु. एस. एफ. डी. ए मान्यताप्राप्त आहे व ती कोणत्याही औषधाच्या दुकानात उपलब्ध आहे व कोव्हीड होऊ नये म्हणून रोज एक गोळी घेतल्यास त्याचा प्रतिबंधात्मक उपयोग होऊ शकतो.बारामतीसारख्या तालुकापातळीवर डॉक्टर चमूने कोव्हीडच्या आपत्कालीन परिस्थितीत आंतरराष्ट्रीय निकषानुसार संशोधन करून जागतिक महासंकटात उपाय शोधण्यासाठी प्रयत्न केले व त्याची दखलही घेतली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT