petrol sakal
पुणे

गेल्या महिनाभरात एकदाही पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही

महागाईने वैतागलेल्या वाहनचालकांना दिलासा, सीएनजी वगळता इंधनाचे दर कमी होण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनलॉक सुरू झाल्यानंतर सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरवाढीपासून वाहनचालकांना गेल्या महिन्याभरात काहीसा दिलासा मिळाला आहे. दररोज सुरु असलेली दरवाढ आता थांबली असून उलट दर कमी होण्यास सुरवात झाली आहे. सीएनजीमात्र त्याला अपवाद ठरले आहे.

१७ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान एकदाही पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले नाहीत. आनंदाची बाब म्हणजे या काळात चार वेळा दर काही पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने दरवाढ झाली त्याच प्रमाणे दर कमी व्हावेत, अशी आस वाहनचालकांना आहे.

दर कमी होण्याची प्रमुख तीन कारणे :

- डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे

- सौदी अरबने उत्पादन वाढविल्याने पुरेसे इंधन उपलब्ध होत आहे

- कच्चा तेलाच्या किमती प्रती बॅरल ७५ वरून ७१ डॉलर झाल्या आहेत

''इंधनाचे दर वाढतच राहिले तर त्यांचा परिमाण महागाई वाढण्यावर होतो. त्यामुळे आता दर कमी होत आहे ही चांगली बाब आहे. जानेवारी २०२० मध्ये जे दर होते तेवढेच दर पुन्हा व्हायला हवेत. तसे झाल्यास सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी कमी होईल. तसेच इतर वस्तूंच्या किमती देखील कमी होतील."- विशाल झगडे, दुचाकीधारक नोकरदार

''इंधनाच्या किमती कमी होत आहेत, ही खूप चांगली बाब आहे. सरकारने कर कमी केले तर वाहनचालकांच्या खिश्‍यावरील बोजा आणखी कमी होईल. रुपयाचे मजबुतीकरण, पुरेसा पुरवठा आणि कच्चा तेलाच्या किमती कमी होत गेल्या तर दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने आता दुष्काळी बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.'' -अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

सीएनजी ९० पैशांनी महागले :

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती परवडत नसल्याने आता अनेकांनी सीएनजी किंवा इलेक्ट्रॉनिक वाहने घेण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र आता सीएनजीचे दर ९० पैशांनी वाढले आहेत. दोन ऑगस्ट रोजी ही दरवाढ झाली आहे.

१७ जुलैपासूनचे दर :

पेट्रोल - 107.45

पॉवर पेट्रोल - 111.13

डिझेल - 95.60

सीएनजी - 56.60

02-08-2021

पेट्रोल - 107.45

पॉवर पेट्रोल - 111.13

डिझेल - 95.60

सीएनजी - 57.50

19-08-2021

पेट्रोल -107.45

पॉवर पेट्रोल - 111.13

डिझेल - 95.19

सीएनजी - 57.50

20-08-2021

पेट्रोल - 107.45

पॉवर पेट्रोल -111.13

डिझेल - 94.99

सीएनजी - 57.50

23-08-2021

पेट्रोल - 107.28

पॉवर पेट्रोल - 110.96

डिझेल - 94.80

सीएनजी - 57.50

24-08-2021

पेट्रोल - 107.14

पॉवर पेट्रोल -110.82

डिझेल - 94.64

सीएनजी - 57.50

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT