Sim-Swapping
Sim-Swapping 
पुणे

सीमकार्ड अपडेट करायला जाल अन् खिसा रिकामा करून घ्याल; वाचा सविस्तर बातमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कॉल ड्रॉप,  इंटरनेट स्पीड आदी त्रुटी दूर करण्याची बतावणी करुन मोबाईल धारकाची सर्व माहिती घ्यायची. त्यानंतर सीम कार्डमधील माहिती क्लोन व स्वॅपिंगद्वारे मिळवून ग्राहकांचे बँक खाते रिकामे करायचे. अगदी काही मिनिटात गंडा घालायची ही नवीन शक्कल सायबर चोरांनी सध्या शोधली आहे.

‘सीम स्वॅपिंग’द्वारे नागरिकांच्या खात्यातील रकमा काढून घेतल्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांत घडले आहेत. सायबर पोलिस ठाण्यात आतापर्यंत अशा पाच तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केल्यास नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. प्रतिसाद दिल्यास आर्थिक फटका बसू शकतो, असे सायबर गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले.

कोणतीही मोबाइल कंपनी ग्राहकांच्या क्रमांकावर संपर्क साधून त्यांना वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती विचारत नाही. अशा प्रकारे कोणी संपर्क साधल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये किंवा चोरट्याने एखादा संदेश पाठविण्यास सांगितल्यास संदेश देखील (एसएमएस) पाठवू नये. अशा प्रकारे एखाद्यााने संपर्क साधल्यास त्वरित मोबाइल कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे किंवा बँकेत संपर्क साधावा. बँक खात्याशी जोडणी केलेला मोबाइल क्रमांक बदलून घ्यावा. तसेच पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पायगुडे यांनी केले आहे. 

अशी होते फसवणूक : 
फोन केल्यानंतर समोरील चोरटा मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करतो. कॉल ड्रॉप, इंटरनेटचा वेग आदी त्रुटी दूर केल्या जातील. त्यासाठी फक्त सीमकार्ड अद्यायावत करावे लागेल, असे चोरट्यांकडून सांगितले जाते. त्यानंतर चोरटा मोबाइल क्रमांकावर एक २० अंकी सीमकार्ड क्रमांक असलेला संदेश पाठवितो. हा संदेश पुन्हा १२३५४ या क्रमांकावर पाठविण्यास सांगितले जाते.

संदेश पाठविल्यानंतर लगेचच सीमकार्ड बंद पडते. ज्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याकडून संपर्क साधण्यात आला असेल तो क्रमांक आपोआप चोरट्याकडील सीमकार्डवर सुरू होतो. त्यानंतर बँकेकडून येणाऱ्या संदेशाचा गैरवापर करून चोरटा बँक खात्यातून पैसे काढून घेतो. 

अशी घ्या काळजी : 
- कोणतीही मोबाईल कंपनी ग्राहकांना अशा प्रकारे फोन करुन माहिती विचारत नाही.
- फसवणूक करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राच्या बाहेरील इतर राज्यातून बोलत असते.
-  कोणताही फोन आल्यावर तो कोठून बोलत आहे, हे लक्षात घ्यावे.
- सिमकार्डच्या मागील सिम कार्ड नंबर कोणाशी शेअर करु नका.
- सिम नंबर कोणत्याही अनोळखी नंबरवर फॉरवर्ड करु नये.
- आपली खासगी माहिती सोशल मिडियावर अपलोड करु नये.
- असा प्रकार आपल्याबरोबर घडल्या तात्काळ आपल्या टेलिफोन कंपनीशी संपर्क साधावा.
- बँक खात्याशी लिंक मोबाईल क्रमांक बदलून घ्यावा किंवा बंद करावा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT