water1.jpg 
पुणे

पुण्यातील 'या' कंटेन्मेंट झोनमध्ये आता 'हे' नवे संकट

सकाळवृत्तसेवा

येरवडा (पुणे) : शंभर वर्षांपूर्वीच्या जलवाहिनीचा व्हॉल्व महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सापडत नसल्यामुळे कंटेन्मेट परिसर असलेल्या ताडीवाला रस्त्यावरील रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या पाच दिवसापासून येथील नागरिकांना पिण्याची पाणी येत नसल्यामुळे चक्क टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

लष्कर पाणीपुरवठा येथून येणारी ब्रिटीशकालीन २७ इंची जलवाहिनी ससून, मंगळवार पेठ मार्गे राजभवन तर आरटीओ येथून बंडगार्डन व पाटील इस्टेट मार्गे उपजलवाहिन्या जातात. मात्र, गेल्या पाच दिवसापासून बंडगार्डनकडे जाणाऱ्या उपजलवाहिनीला पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ताडीवाला रस्ता परिसरात पाणीच नाही. त्यामुळे येथील रहिवाशांचे हाल होत आहे. येथे दररोज तीस टॅंकरच्या फेऱ्या होत आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बंडगार्डन पाणीपुरवठा अधिकारी युध्दपातळीवर काम करीत आहेत. जलवाहिनीतील बिघाड शोधण्यासाठी त्यांना व्हॉल्व भेटत नसल्याचे अधिकाऱ्यांनी कबुल केले. त्यांनी सोमवारी नगरसेविका लता राजगुरू, नगरसेवक प्रदिप गायकवाड आणि सुजित यादव यांच्यासमवेत ब्रिटीशकालीन जलवाहिन्यांची दाखविल्या. मात्र, राजगुरू आणि गायकवाड यांनी तांत्रिक बाब न सांगता लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे सांगितले.
 
‘‘ ब्रिटीशकालीन जलवाहिन्यांतील बिघाड शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. ताडीवाला परिसरातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत केले जाईल. शहरात २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्यासाठी बंडगार्डन रस्त्यावर हजार मिलीलिटर व्यासाची जलवाहिनी टाकली असून त्यामुळे भविष्यात येथील पाणीपुरवठा खंडित होणार नाही.’’
- रमेश वाघमारे, कार्यकारी अभियंता, बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग
ना रेशन किट, ना पाणी !
ताडीवाला रस्ता कंटेन्मेट परिसर आहे. याठिकाणी महापालिकेच्या वतीने तब्बल चाळीस टक्के नागरिकांना रेशन किटचे वितरण केले नाही. त्यामुळे मजुरांची उपासमार होत आहे. त्यामध्ये गेली पाच दिवस पाणीपुरवठा नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींनी राबवलं ऑपरेशन डी-टू'', उज्वल निकमांनी घेतलं थेट पाकिस्तानचं नाव

Trip Locations : गुगलवर वर्षभरात सर्च झालीत टॉप 5 ठिकाणे, दोन दिवसांची सुट्टी घेऊन प्लॅन करा ट्रीप, खर्चही एकदम कमी

Latest Marathi News Live Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग, सुदैवाने कुणालाही इजा नाही

ICC Rankings: वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा नंबर १! ऑस्ट्रेलियान खेळाडूला धक्का; पण, स्मृती मानधनाने गमावला ताज

नियती इतकी निर्दयी कशी? अपघात आई-वडिलांचं छत्र हरवलं, निरागस लेकरांनी एकमेकांना सावरलं; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT