वारजे (पुणे) : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे क्वारंटाइनचा आकडाही दररोज 200 च्या पुढे जात असल्याने तपासणी करण्यासाठी नागरिकांना 4 ते 5 दिवस लागत आहे. त्यामुळे वारजे-कर्वेनगर भागातच कोविड -19 तपासणी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका वृषाली चौधरी यांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे यांच्याकडे केली आहे.
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. 13, 31 आणि 32 या प्रभागांमध्ये सुमारे 2 लाख लोकसंख्या असून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून येथील covid-19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना तपासणी करण्यासाठी धायरी येथील लायगुडे हॉस्पिटल व वडगाव येथील सिंहगड हॉस्पिटल येथील तपासणी केंद्रात नेले जात आहे. परंतु या केंद्रांमध्ये एका दिवसामध्ये केवळ 50 स्वॅब तपासणी किट उपलब्ध होत असल्याने केवळ 50 जणांची तपासणी केली जाते, तसेच या केंद्रापर्यंत रूग्ण पोहचवण्यासाठी बरेच मनुष्यबळ व आर्थिक खर्च देखील होत आहे.
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत तपासणीसाठी असणाऱ्या रुग्णांची संख्याही या आठवड्यात दररोज सुमारे 150 ते 200 पर्यंत असून त्यामुळे तपासणीसाठी त्यांना 3 ते 4 दिवस वाट पाहावी लागत आहे. तसेच पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढू शकते. या काळामध्ये वेळेत तपासणी न झाल्यामुळे या रुग्णांत संशयित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे बऱ्याच जणांना कोरोनाची लागण होण्याची संभावना जास्त आहे. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कोथरूड, कर्वेनगर, वारजे, माळवाडी आणि शिवणे, उत्तमनगर परिसरासाठी कर्वेनगर- कोथरुड भागांमध्ये अद्यावत स्वतंत्र असे कोरोना तपासणी केंद्र सुरू करण्यात यावे. जेणेकरून या भागातील नागरिकांना आपली कोरोना चाचणी करणे सोपे व सोयीस्कर होईल. तसेच कोरोना आहे की नाही हे लगेच कळेल आणि त्याच्यावर उपचार करणे सोयीचे होईल. असे दत्तात्रय चौधरी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.