these are the 8 candidates from bjp for pune s assembly constituency in maharashtra vidhansabha elections 2019 
पुणे

Vidhan Sabha 2019 : हे आहेत पुण्यातील भाजपचे आठ उमेदवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 125 उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली. या यादीमध्ये पुण्यातील आठही उमेदवारांचा समावेश असून, कसबा मतदार संघातून मुक्ता टिळक, कोथरूड चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपने आज दिल्लीत पहिली यादी जाहीर केली. यामध्ये राज्यातील 125 मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुण्यातील कसबा, कोथरूड आणि शिवाजीनगर या मतदार संघांसह हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती या मतदारसंघांचा समावेश आहे. 

शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांना कसबा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली असून कोथरूड मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवाजीनगर मतदारसंघातून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांना, तर पुणे कॅन्टोन्मेंटमधून विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांचे भाऊ सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, हडपसरमधून विद्यमान आमदार योगेश टिळेकर, खडकावासल्यातून भीमराव तापकीर, पर्वतीतून माधुरी मिसाळ, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांना उमदेवारी कायम ठेवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असतानाही त्यांचा पत्ता कट करून अनुक्रमे पाटील आणि शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कसब्याचे आमदार गिरीश बापट हे खासदार झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली होती. त्यामुळे कसबा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते. मात्र, महापौर टिळक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवनीत राणांची पक्षातून हकालपट्टी करा! भाजपच्या पराभूत उमेदवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, विरोधात कसं काम केलं तेही सांगितलं!

JEE Mains Admit Card 2026 Released : ‘जेईई मेन’ परीक्षेचे प्रवेशपत्र जारी!, जाणून घ्या, कसे डाउनलोड करता येईल?

U19 WC, IND vs BAN: वैभव सुर्यवंशीने मोडला विराट कोहलीचा विक्रम, अभिग्यान कुंडूनेही दिली झुंज; भारताचे बांगलादेशसमोर मोठं लक्ष्य

UPSC मुलाखत वेळापत्रकात बदल; 22 जानेवारीची दुपारची शिफ्ट रद्द, पुढील तारीख जाणून घ्या

Manikarnika Ghat : काशीत कोणतेही मंदिर पाडले नाही! CM योगींनी सुनावलं; AI Video बनवून बदनामी! '

SCROLL FOR NEXT