पुणे

तब्बल दहा मिनिटे बिबट्याशी आमना सामना

नवनाथ भेके

निरगुडसर (पुणे) - निरगुडसर ऊसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकासमोर अवघ्या तीन फुटावर बिबटयाने डरकाळी फोडली परंतु गणेश निघोट हा युवक प्रसांगवधान राखत बिबटयापासुन आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरला तब्बल दहा मिनिटे हे दोघे आमने-सामने होते हा प्रकार नागापुर (ता.आंबेगाव) येथील निकम मळ्यात सोमवार (ता.03) रोजी सायंकाळच्या सुमारास घडला.

आंबेगाव तालुक्यात ऊसक्षेत्र अधिक असल्याने ऊसश्रेञ बिबटयाचे एकप्रकारे आश्रयस्थान बनले आहे त्यामुळे शेतक-यांना बिबटयाचे दर्शन घडत आहे त्यामुळे जीव मुठीत घेऊन शेतक-यांना शेतीचे कामे करावी लागत आहे. अशाप्रकारे नागापुर परीसरात बिबटयांचा वावर वाढला आहे मागील आठ दिवसापुर्वी निकममळ्यातच बाबु पोहकर यांना बिबटयाचे दर्शन झाले होते तसेच मधुकर वाघ यांच्या घराच्या पाठीमागुन बिबटयाने रस्ता ओलंडताना काही प्रवाशांनी रात्रीच्या वेळी पाहिले होते. अशाच प्रकारे सोमवारी सांयकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गणेश जगन्नाथ निघोट हा युवक ऊसाच्या शेताला पाणी देण्यासाठी गेला होता त्य़ावेळी अवघ्या तीन फुटावर बिबटयाला पाहुन त्याची बोबडीच वळली परंतु जीव वाचवण्यासाठी बिबटयाला पाहुन पाठमोरा पळाला नाही,बिबटया पाठीमागुन हल्ला करील या भीतीने हातात मोठे दगड घेऊन हळुहळु पाठीमागे सरला त्यामध्ये तो अचानक जमीनवर मागे कोसळलाही त्यावेळी बिबटयाची डरकाळी अधिकच वाढली होती परंतु प्रसांगवधान राखत बिबटयाच्या तावडीतुन मागे सरकत काही अंतरावरुन घराकडे सुसाट धाव घेतली हा प्रकार जवळपास दहा मिनिटे सुरु होता,घरी येऊन हा प्रकार घरच्यांना सांगुन त्याने सुटकेचा निश्वास घेतला.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याची सुचना केली असुन मंगळवार(ता.04) रोजी पिंजरा लावण्यात येणार आहे. घटनेची माहीती मिळताच वनरक्षक भानुदास भालेराव यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. मागील वर्षी याच ठिकाणी बिबटयाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT