Crime 
पुणे

पुणे : सोनसाखळी मिळाली नाही म्हणून मोबाईल चोरण्याचा केला प्रयत्न पण...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र पादचाऱ्याकडे सोनसाखळीच नसल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्याने त्यांच्या खिशात हात घालून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला.

परंतु प्रसंगावधान दाखवत पादचाऱ्याने चोरट्याच्या हाताला पकडले, त्यामुळे तो खाली पडला. त्याचा दुचाकी चालविणारा साथीदार पळून गेला. इकडे चोरटा मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बुधवारी (ता.२६) रात्री पावणे दहा वाजता हा प्रकार शनिवारवाड्यासमोर घडला. 

अर्शद सलीम शेख (वय 20) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिकेत धस (वय 38, रा. गणेश पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख कसबा पेठेतील अग्निशमन केंद्राजवळून रात्री पावणे दहा वाजता जात होते. ते रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरील चोरटे त्यांच्या दिशेने आले.

दुचाकीवर पाठीमागे शेख बसलेला होता. त्याने धस यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु धस यांनी सोनसाखळी घातली नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने त्यांच्या शर्टच्या खिशामध्ये हात घालून जबरदस्तीने मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी धस यांनी शेखचा हात पकडून त्यास खाली खेचले. त्यामुळे शेखचा तोल जाऊन तो दुचाकीवरुन खाली पडला.

या प्रकारामुळे गडबडलेल्या शेखच्या साथीदाराने दुचाकीवरुन धूम ठोकली. परंतु शेख धस यांच्या हाती लागला. तेवढ्यात हा प्रकार पाहणारे नागरिकही धस यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी शेखला पकडून ठेवून पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी शेख यास ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिअर पाजून चौघांनी अत्याचारानंतर संपवलं, मृतदेह तिथंच टाकून पसार; कुत्र्यांनी तोडले लचके, प्रियकरासह तिघांना अटक

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

मोकळे व्हा : बाळाच्या संगोपनात भावनांचा गुंता!

Chandukaka Saraf 200th Anniversary: दोनशे वर्षांच्या विश्वासाचा जल्लोष; प्रामाणिक सेवेसाठी कर्मचाऱ्यांच्या हातात कार व दुचाकीच्या चाव्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - १९ सप्टेंबर २०२६

SCROLL FOR NEXT