Crime_Theft 
पुणे

ऐन गणेशोत्सवात चोरट्यांचा धुमाकूळ; सदाशिव पेठ-आंबेगावमधून लाखांचा ऐवज केला लंपास

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून चोरट्यांकडून घरफोडीचे सत्र सुरुच आहे. गणेशोत्सव सुरू असतानाच चोरट्यांनी सदाशिव पेठ आणि आंबेगाव बुद्रूक येथे घरफोडी करुन सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी घरात ठेवलेली कारची चावी घेऊन पार्किंगमध्ये लावलेली कार देखील पळविली.

सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनीतील आशुतोष गांधी (वय ३५) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गांधी यांची विजयानगरमधील दिनार अपार्टमेंटमध्ये सदनिका आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेली एक लाख ५८ हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ६ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. 

दरम्यान, आंबेगाव बुद्रुक येथील चोरीच्या घटनेप्रकरणी सतीश कमलेकर (वय ४५) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमलेकर यांची जांभुळवाडी रोडवरील जाई अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर सदनिका आहे. दोन दिवसांपूर्वी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील कपाटात ठेवलेले ३ लाख १५ हजारांचे दागिने चोरुन नेले. तसेच त्यांनी घरात ठेवलेली कारची चावी घेऊन चोरट्यांनी पार्किंगमध्ये लावलेली कारदेखील चोरुन नेली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT