Tea 
पुणे

चहाची तल्लफ पडली‌ पावणे तीन लाखाला; कशी ते वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मध्यरात्रीच्यावेळी एका तरुण सराफी व्यावसायिकास चहाची तल्लफ झाली. ते चहा पिण्यासाठी मध्यरात्री लक्ष्मी रस्त्यावर आले. मात्र, चहा पिण्यापूर्वीच त्यास चोरट्यांनी अडविले. त्यास धमकावत, त्यांच्या हातातील सोन्याचे कडे, सोनसाखळी आणि रोकड असा तब्बल पावणे तीन लाखांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी तेथून धूम ठोकली, त्यामुळे सराफी व्यावसायिकास चहाची तल्लफ चांगलीच नडल्याचे या घटनेने सिद्ध केले.

जितेंद्र राठोड (वय ३०, रा. तानाजीवाडी, शिवाजीनगर) यांचे शिवाजीनगर परिसरात सराफी दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री साडे बारा वाजता जितेंद्रला चहाची तल्लफ झाली. आता इतक्‍या रात्री चहा कुठे मिळणार, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला. त्यावेळी लक्ष्मी रस्त्यावरील बॅंक ऑफ बडोदाजवळ एका चहाच्या टपरीवर चहा मिळू शकतो, अशी शक्‍यता त्यांना वाटली. त्यामुळे जितेंद्र आपली दुचाकी घेऊन लक्ष्मी रस्त्यावर दाखल झाले.

त्यानंतर ते बॅंक ऑफ बडोदा येथे जात होते. तेवढ्यात त्यांना तिघांनी अडविले. त्यापैकी एकाने जितेंद्रला "या भागात काय काम आहे' अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांना धमकी देऊन तिघांनी त्यांच्या हातात असलेले सोन्याचे कडे, गळ्यातील सोनसाखळी आणि खिशात असलेली अडीच हजार रुपयांची रोकड असा दोन लाख 80 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर चोरटे दुचाकीवरुन तेथून पसार झाले. दरम्यान, या घटनेनंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज पाटील करीत आहेत.

स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात दोन दिवसांपूर्वी मोबाईल आणि पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना विरोध केला, म्हणून एका रुणाचा खून झाला. तर गणेशोत्सवात सेवानिवृत्त पोलिसावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेला. तर दूध घेऊन घरी जाणाऱ्या वृद्ध महिलेस सोसायटीच्या जिन्यात गाठून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने चोरल्याची घटना ताजी आहे. या घटनेबरोबरच शहरामध्ये जबरी चोरीच्या घटना वारंवार घडत असूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याची सद्यस्थिती आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT