Thieves Robs in two flats overnight when family went out on Republic Day  
पुणे

प्रजासत्ताकदिनी चोरट्यांनी फोडल्या 2 सदनिका; सुट्टीमुळे गावी गेलेल्या कुटंबाला 6 लाखांचा भुर्दंड

नितीन बारवकर, शिरूर

शिरूर(पुणे) : प्रजासत्ताकदिनी सुट्टी असल्याने लोक बाहेरगावी गेल्याचा गैरफायदा घेत चोरांनी एका रात्रीत दोन सदनिका फोडल्या. एका सदनिकेतून त्यांना काही मिळाले नसले, तरी दुसऱ्या एका सदनिकेतील कपाटातून सुमारे सहा लाख रूपयांचे सोन्या - चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले. शहरातील मध्यवस्तीतील 'समर्थ हाईट्स' या सोसायटीत घरफोडीचा हा प्रकार घडला.    नबाजी ताराचंद दुर्गे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दुर्गे यांची शहरातील गोलेगाव रस्त्यावरील समर्थ हाईट्समध्ये सदनिका असून ते कुटुंबियांसह तेथे राहतात. हुबळी येथे शिकणाऱ्या मुलीला सोडविण्यासाठी ते कुटूंबियांसह चालले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सोमवारी (ता. 25) रात्री ढोकसांगवी (ता. शिरूर) येथे नातेवाईकांकडे मुक्काम करून मंगळवारी (ता. 26) सकाळी ते निघाले होते. पुण्यापर्यंत गेले असतानाच शिरूर मधील शेजाऱ्यांनी त्यांना त्यांच्या सदनिकेचे दार तुटलेले असल्याचे कळविल्याने ते परत आले. प्रजासत्ताकदिनी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. दुर्गे यांच्या घरातून सुमारे तीस तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने मिळून सुमारे सहा लाख रूपयांचा ऐवज चोरीला गेला.

समर्थ हाईट्समध्ये चोरटे चारचाकी वाहनातून आल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झाले असून, आल्याआल्या त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोंडे काठीने वरच्या बाजूला केली.  काही ठिकाणी सीसीटीव्हीच्या वायरी कापून टाकल्या. या सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील एक सदनिका फोडली परंतू तिथे कुणी राहात नसल्याने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.

दृष्टीहीन रिना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलिस आयुक्त  

त्यानंतर त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील दुर्गे यांच्या सदनिकेकडे मोर्चा  वळविला. या सदनिकेला लोखंडी दरवाजा असून चोरट्यांनी तो तोडला. त्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूप कटावणीने तोडून चोरट्यांनी सदनिकेत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचा दरवाजा तोडून तिजोरीतील मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट, कर्णफूले, अंगठी, लाॅकेट या सोन्याच्या दागिन्यांसह पैंजण, जोडवी व काही चांदीच्या वस्तूही चोरट्यांनी चोरून नेल्या.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे करीत आहेत.         

 दुसरी पत्नीही पतीच्या पेन्शनची वारसदार; जवानाच्या पत्नीला दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT