Umbrella_Shop 
पुणे

काय सांगता? दुकानदाराला छत्री पडली पावणे दोन लाखाला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ठिकाण सहकारनगर गल्ली क्रमांक २, वेळ रविवारी (ता.२६) दुपारी ३.१५ वाजताची. एका दुकानामध्ये तीन ग्राहक येतात. एक व्यक्ती बाहेर ठेवलेली छत्री विकत घेण्यासाठी दुकानदाराला बाहेर बोलावते. त्याचवेळी अन्य दोघेजण दुकानात वस्तू घेण्यासाठी आत शिरतात. छत्री घेणारा दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवतो, तर दुसरे दोघेजण गल्ल्यातील तब्बल पावणे दोन लाख रुपये क्षणार्धात काढत तेथून पळ काढतात. अवघ्या काही मिनिटातच दुकानादाराने छत्रीमुळे तब्बल पावणे दोन लाख रुपये गमावलेले असतात.

सहकारनगरमधील तुलसी व्हरायटीचे मालक महेंद्र चौधरी (वय २१, रा. धनकवडी) यांनी या घडलेल्या प्रकाराबाबत दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी चौधरी यांचे सहकारनगरमधील गोळवलकर पथ या रस्त्यावर तुलसी व्हरायटी नावाचे दुकान आहे.

रविवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या दुकानात ३ व्यक्ती छत्री खरेदी करण्यासाठी त्यांच्या दुकानात आले. त्यांनी फिर्यादी चौधरी यांना छत्री दाखविण्यासाठी दुकानाबाहेर बोलावून घेतले. तसेच त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले.

दुसऱ्या चोरट्याने फिर्यादीची नजर चुकवून दुकानात गेला आणि गल्ल्याच्या खालील कप्प्यात ठेवलेली एक लाख ६५ हजार रुपयांची रक्कम, फिर्यादीच्या वडिलांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, दुचाकी लायसन्स अशी कागदपत्रे असलेली बॅग चोरून नेली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी चौधरी यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT