Crime_Theft 
पुणे

काय म्हणावं चोरट्यांना; लोणी-काळभोरमधून डोळे चेक करायच्या मशिन पळवल्या

सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : 80 हजार रुपये किमतीच्या डोळे चेक करण्याच्या मशिन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात हा प्रकार घडला. गुरूवारी (ता.११) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुकानदार ज्ञानेश्वर दत्तात्रय कुंभार यांनी लोणी काळभोर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कुंभार यांचे लोणी स्टेशन येथे चष्म्याचे दुकान आहे. बुधवारी (ता.१०) संध्याकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. गुरुवारी (ता.११) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेजारी दुकानदार असलेले सनी सावंत यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या दुकानाचे शटर दोन फूट उघडलेले दिसत आहे. त्यानंतर कुंभार यांनी दुकानाची पाहणी केली असता दुकानाचे शटर उचकटण्यात आल्याचे त्यांना निदर्शनास आले.

दुकानात जाऊन पाहणी केली असता पन्नास हजार रुपये किमतीची एक आणि तीस हजार रुपये किमतीची एक अशा एकूण 80 हजार रुपयांच्या दोन मशिन्स अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कुंभार यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Day: होळी, मोहरम आणि गांधीजयंती दिनी दारूची दुकाने उघडण्यास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय, उत्पादन शुल्क धोरणात बदल

'सैराट'मधून किती पैसे मिळाले? रिंकूने असं काय म्हटलं की होतेय ट्रोल? वाचून तूम्हीही म्हणाल- काहीही हा श्री

Igatpuri News : सावधान! तुम्ही खात असलेली कुल्फी 'विष' तर नाही? इगतपुरीत बनावट कुल्फी कारखान्याचा पर्दाफाश

Ramadan Moon Sighting Rules : इस्लाममध्ये रमजान पवित्र का मानला जातो? 'या' पाच स्तंभांना का आहे महत्त्व?

Gas and Headache: गॅस डोक्यात जातो का? ‘या’ 4 लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT